Breaking News

नागपुरातील कोराडी देवी मंदिर : २५ हजार दिवे, रोषणाई, ६ हजार किलो रामहलवा

Advertisements

अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नागरिकांनी आपआपल्या घरावर भगवा ध्वज लावावा तसेच किमान पाच दिवे घराच्या प्रवेशद्वारावर लावून आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत नागपूरमधील कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर व्यवस्थापनाने श्री राम प्रतिष्ठापणा दिनी भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. हे येथे उल्लेखनीय.

Advertisements

दरम्यान, सोहळ्यानिमित्त मंदिरात सर्वत्र रोशनाई करण्यात आली आहे. प्रतिष्ठापणा झाल्यावर २५ हजार दिवे लावून दीपमाळा उजळविण्यात येतील. मिष्ठान्न म्हणून ६००० किलोचा राम हलवा प्रसाद शिजविला जाणार आहे. कोराडी देवी मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात सोमवारी १२.२० वाजता रामाची महापूजा व आरती केली जाणार. सोबतच सकाळी ९.०० वाजता रामभक्त मिथिलेश तिवारी सुंदरकांडाचे पठण करणार आहेत.

Advertisements

१००० चौरस फुटांची स्क्रीन
अयोध्येतील प्रभू श्री राम प्रतिष्ठापणा दिनाच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १००० चौरस फुटाची भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. यावरून प्रतिष्ठापणा दिनाचा कार्यक्रम हजारो भाविक थेट अयोध्येतील प्रतिष्ठापणा सोहळा पाहू शकतील.

मंदिर प्रशासन सेवेसाठी सज्ज
मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी ज्येष्ठ नागरिक व अपंगांच्या दर्शनासाठी इलेक्ट्रीक व्हेईकलची सोय मंदिर प्रशासनाने केली आहे. पोलिस प्रशासनाकडूनही सर्व तयारी पूर्ण असल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिराच्या वतीने चालविण्यात येणारे अन्नछत्राचा लाभ व नजिकच्या रामायण सांस्कृतिक केंद्राला भेट देण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड …

मंदिर बना जंग का अखाड़ा: श्रद्धालुओं और पुजारियों के बीच झगड़ा, जमकर चले लाठी डंडे

मंदिर बना जंग का अखाड़ा: श्रद्धालुओं और पुजारियों के बीच झगड़ा, जमकर चले लाठी डंडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *