Breaking News

प्रसन्ना वराळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून आज घेणार शपथ

नागपूर हायकोर्टात बरीच वर्षे न्यायमूर्ती पदावर काम करणारे आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे (दि. २५ गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.

न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सुरुवातीला ​​​औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केल्यानंतर जुलै २००८ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायदान सेवेत आले. पुढे १४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर न्या. प्रसन्ना वराळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

२३ जून १९६२ रोजी निपाणी येथे जन्मलेले प्रसन्ना वराळे यांना शिक्षणाचा व कायदा क्षेत्राचाही चांगला वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते. न्या. प्रसन्ना वराळे यांनी आपले शालेय शिक्षण शहादा, शिरपूर, नाशिक इथून पूर्ण केल्यानंतर लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली सुरू केली. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.

About विश्व भारत

Check Also

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा टेकचंद्र …

महामार्गावरील प्रवास महागला : नाक्याच्या टोलमध्ये वाढ

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-नाशिक-गोंदे या टप्प्यातील सहापदरी मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास आता महागणार आहे. टोलच्या सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *