Breaking News

नागपुरातील सावनेरमध्ये एटीएम फोडून १० लाख रुपये पळवले

नागपूर ग्रामीण मधील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत स्टेट बँकेचे(SBI) एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल साडे दहा लाखांची रक्कम पळवली. मंगळवारी पहाटे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री ३.३० वाजता एक चारचाकी वाहन सावनेरमधील बाजार चौकातील स्टेट बँकेच्या एटीएमपुढे थांबले. त्यातून तीन ते चार आरोपी तोंडावर कापड बांधलेल्या अवस्थेत खाली उतरले. त्यांनी तेथे कोणीही नसल्याचे बघत गॅस कटर घेऊन एटीएम गाठले. त्यानंतर एटीएमचे दार बाहेरून लावून कटरने एटीएम कापले . त्यातील १० लाख ३० हजार रुपये रोख घेऊन आरोपी पसार झाले.

 

दरम्यान पहाटे परिसरातील नागरिक येथे गोळा झाले. काहींना बँकेच्या एटीएममधून पाणी बाहेर येतांना दिसल्याने त्यांनी शोध घेतला. त्यांना एटीएम कापून त्यातून पैसे पळवल्याचे निदर्शनात आले. गॅस कटरने यंत्र कापतांना पाण्याचा वापर करण्यात आला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांनाही माहिती दिली. एटीएमचे काम असलेल्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.

 

तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी तातडीने विविध चमूच्या मदतीने आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात येथे सुरक्षा रक्षक रात्री तैनात नसल्याचे पुढे आले. दरम्यान पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. चोरट्यांनी भर चौकातील एटीएम फोडल्याने येथील पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेचे गांभिर्य बघत येथे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार आणि इतरही अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

About विश्व भारत

Check Also

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या टेकचंद्र …

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *