Breaking News

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या डोळ्यात प्रॉब्लेम : दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

नुकतेच सईने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत. सई म्हणाली, एका चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. शुटिंगच्या दोन दिवस अगोदर मला कळालं की मला बदलण्यात आलं आहे. माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे म्हणणं होतं. त्यानंतर मला खूप खचल्यासारखं वाटत होतं.”

सई पुढे म्हणाली, “जेव्हा आपल्या वाटत असतं की सगळं संपलं आहे. तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की हा काळही सरणार आहे. मी ज्या परिस्थितीतून गेले त्या परिस्थितीने मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमची एकाग्रता कशी ढळू दयायची नाही हे शिकवलं. त्या दिग्दर्शकाला माझ्यात जी उणीव दिसली होती. लोकं त्याच गोष्टीसाठी माझे खूप कौतुक करतात.

सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबर बॉलीवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे, येत्या २ फ्रेबुवारीला तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका आहे.

About विश्व भारत

Check Also

Actor Manoj Kumar dies at 87 : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…!

Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *