Breaking News

नागपुरात आठ ट्रक पाण्यात बुडाले : काय आहे खळबळजनक प्रकरण? वाचा

Advertisements

नागपूरजवळील महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याच्या आतील एक पाणी अडवणारा बंधारा मंगळवारी पहाटे फुटला. कोराडी मंदिराच्या मागील बाजूस घडलेल्या या घटनेमुळे तेथे राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याने खळबळ उडाली.

Advertisements

कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार नित्याने राख उचलून वितरीत करतात. दरम्यान मंगळवारी पहाटेपासून येथे बंधाऱ्याच्या आतमध्ये राख उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी एका जेसीबीचा पंजा आतमधील पाणी अडवलेल्या बंधाऱ्यावर पडला. त्याने बंधाऱ्यातील पाणी बाहेर झिरपू लागले. दरम्यान हळू- हळू पाण्याचा वेग वाढला. थोड्याच वेळात राखेची उचल होणाऱ्या भागात हे पाणी शिरले. यावेळी येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पाण्यात बुडाले. ही माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले. तातडीने काही अधिकारी घटनास्थळी पोहचले.

Advertisements

महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, कोराडी प्रकल्पातील राख बंधाऱ्यातील राख नि:शुल्क वितरीत केली जाते. ही राख उचलण्याचे काम खासगी व्यक्तीकडे आहे. येथे राख उचलून नेण्यासाठी पाण्याची अडचण होऊ नये म्हणून मध्ये पाणी अडवण्यासाठी राखेचा एक बंधाराही तयार आहे. मंगळवारी पहाटे राखेची उचल करताना चुकीच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाल्याने पाणी अडवून ठेवणारा हा बंधारा फुटला. बंधाऱ्यातील पाणी राखेची उचल सुरू असलेल्या भागात गतीने शिरले. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की काही वेळातच हे ट्रक पाण्यात बुडाले. या घटनेने राखेची उचल करणारे ट्रकचे नुकसान वगळता इतर कोणतेही नुकसान झाले नसल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.

नियोजनाचा अभाव

“मौदा येथील ‘एनटीपीसी’ प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्याचे आतून निरीक्षण केल्यास तेथे बंधाऱ्याच्या आतही विविध कप्पे करण्यात आले आहे. प्रत्येक कप्यात जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन आहे. तेथपर्यंत वाहनेही जातात. हे बांधकाम चांगल्या दर्जाचे आहे. परंतु महानिर्मितीच्या राखेच्या बंधाऱ्यात काहीही नियोजन नाही. त्यामुळे कधी बंधारे फुटने तर कधी इतर अनुचित घटना घडतात. येथील कामाचे अंकेक्षण व्हायला हवे.” – लिना बुद्धे, संस्थापक, सेंटर फाॅर सस्टेनेबल डव्हलपमेंट.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात बटाटा-कांदा विक्री कार्यालयात देहव्यापार

नागपुरात आतापर्यंत ब्युटीपार्लर, स्पा, मसाज पार्लर, पंचकर्म केंद्र आणि सलूनमधेच देहव्यापार होत असल्याचे समोर आले …

नागपूर महानगरपालिकेने भाजपा आमदाराला दिली ६०० कोटींची जमीन १ रुपयांत

नागपूर महापालिकेच्या आठ-दहा शाळा जागेअभावी भाड्याच्या इमारतीत सुरु असताना महापालिकेने १८.३५ हेक्टर जमीन भाजपचे आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *