Breaking News

धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या लेकीचा ११ वर्षांचा संसार मोडला : ईशा देओल/भरत तख्तानी झाले विभक्त

Advertisements

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर आता विभक्त झाले आहेत.

Advertisements

ईशा आणि भरत यांच्या टीमकडून दिल्ली टाइम्सला निवेदन देण्यात आलं आहे. “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा.” असं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे.

Advertisements

 

ईशाने याबाबत सोशल मीडियावर अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. या जोडप्याला राध्या ( ६ ) आणि मिराया ( ४ ) अशा दोन मुली आहेत.

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरत तख्तानीशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या अभिनेत्रीने तिच्या पहिल्या अपत्याला म्हणजेच राध्याला जन्म दिला. त्यानंतर २०१९ मध्ये ईशाला दुसरी मुलगी झाली. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या होत्या. सोशल मीडियावर तिने पतीसह फोटो शेअर करणंही थांबवलं होतं.

याशिवाय ईशाचा नवरा हेमा मालिनींच्या ७५ व्या वाढदिवसाला देखील हजर राहिला नव्हता. दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *