Breaking News

प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून

बॉलीवूड आणि हॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाआधीच्या सर्व सोहळ्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. मीरा राजस्थानमधील जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव रक्षित केजरीवाल आहे.

मीरा चोप्रा ही सुदेश व नीलम चोप्रा यांची लेक आहे. ती रक्षित केजरीवालशी जयपूरमध्ये १२ मार्च रोजी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींना मेहेंदीपासून सुरुवात होईल. मेहेंदी समारंभ ११ मार्च रोजी संध्याकाळी होईल, संगीत व कॉकटेल ११ मार्चला संध्याकाळी सात वाजता सुरू होईल, त्यांचा हळदी समारंभ १२ मार्चला सकाळी १० वाजता होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता हे जोडपं लग्नबंधनात अडकेल.

मीरा चोप्रा व रक्षित यांच्या लग्नाचे सर्व विधी बुएना व्हिस्टा लक्झरी गार्डन स्पा रेसॉर्टमध्ये होणार आहेत. मीराची ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहते तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. मीरा ही परिणीती व प्रियांका चोप्रा यांची चुलत बहीण आहे.

About विश्व भारत

Check Also

मामले में नया मोड : हनीमून पर कितने करोड में हुआ था करिश्मा कपूर का सौदा?

बॉलीवुड इंडस्ट्री एक ऐसी जगह हैं, जहां से आए दिन ऐसी खबरें सुनने को मिलती …

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *