Breaking News

ऐश्वर्या रॉयच्या गालावर हात लावताना…: रणबीर कपूरने सांगितला ‘रोमान्स’चा अनुभव

Advertisements

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर आणि एट्रॅक्टिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्यासोबत स्क्रिन शेअर करण हे अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. ऐश्वर्याचा प्रत्येक सिनेमा तिच्या चाहत्यांच्या खूप जवळ आहेत. ज्यामध्ये २०१६ साली आलेला रोमँन्टिक ड्रामा ‘ऐ दिल है मुश्किल’चा देखील समावेश आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनात बनलेल्या सिनेमात रणबीर कपूर बॉलिवूडची क्वीन ऐश्वर्यासोबत रोमान्स करताना दिसला होता.

Advertisements

 

एका मुलाखतीत रणबीरने ऐश्वर्यासोबत रोमॅन्स करण्यावर भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, ऐश्वर्यासोबत रोमँन्टिक सीन देण्यासाठी त्याला लाज वाटत होती. रणबीर कपूरने असंही म्हटलं की, मला लाज वाटायची. माझे हात थरथरायचे. कधी-कधी मी तिच्या गालाला हात लावयलाही संकोच करायचो.नंतर त्यानेच सांगितलं की, काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपण फक्त केवळ एक्टिंग करत आहोत. नीट कर. रणबीर पुढे म्हणाला, नंतर मी विचार केला की, कधी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मग मी देखील संधीवर चान्स मारला. आजही ऐश्वर्यासोबतचा ‘तो’ सीन रणबीरला आठवतोय.

Advertisements

 

ऐश्वर्यासोबत काम करण्याच्या एक्सपीरियंन्सला रणबीरने आठवणीत राहिलेला क्षण म्हटलं. त्याने असंही म्हटलं की, माझा एक्सपीरियंन्स खूपच भारी होता. कोणता अभिनेत्याला तिच्यासोबत रोमॅन्स करायला आवडणार नाही? जेव्हा करणने मला सांगितलं की, तो या सिनेमात ऐश्वर्याला कास्ट करतोय तो माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरने खूप सारे इंटीमेट सीन्स दिले आहेत. दोघांच्या केमेस्ट्रीला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्यासोबत रोमँन्टिक सीन दिल्यामुळे ऐश्वर्याला खूप ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

धर्मेंद्रने शबाना आझमीसोबत काय केलं? वाचा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *