Breaking News

खुशखबर; सोन्याच्या दरात पून्हा घसरण : नागपुरात काय आहेत दर?

Advertisements

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केल्यावर दुसऱ्या दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर वाढून ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले होते. परंतु सोन्याच्या दरात घसरन झाल्याने शुक्रवारी (९ फेब्रुवारी) हे दर २९ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली आले आहे.

Advertisements

नागपुरातील सोन्याच्या दरांमध्ये चढ- उतार थांबण्याचे नाव घेत नाही. नागपुरात ९ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर २२ कॅरेटसाठी ५९ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ३०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ९०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ४०० रुपये होता. दरम्यान हे दर २ फेब्रुवारीच्या दुपारी २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये प्रति दहा ग्राम होते. हे दर २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होता. दरम्यान सोन्याच्या दरात सतत बदल होत असले तरी काही महिन्यात हे दर ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

Advertisements

नागपुरातील यापूर्वीचे दर…

नागपुरात २९ जानेवारीला सकाळी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. २५ जानेवारीला हे दर २४ कॅरेटसाठी ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता. तर २४ जानेवारीला २४ कॅरेटचा दर ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!

गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या …

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *