मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. तर संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप केले आहेत. याच संगीता वानखेडेंच्या दाव्यांच्या दाखला देत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांविरोधात आणि प्रामुख्याने शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता वानखेडे यांनी यापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले होते त्या प्रकरणांचीही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, संगीता वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी, जुलै २०२० मध्ये सत्ताधारी पक्षातील आमदाराविरोधात विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करायला हवी. चौकशी करा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवा. आम्हाला काही अडचण नाही. संगीता वानखेडे यांनी पूर्वी एका विधानसभा सदस्यावर आरोप केला होता, त्यासाठीदेखील एसआयटी जाहीर करावी.