भंडारा जिल्ह्यात आयपीएस उपविभागीय पोलीस अधिकारी रशमिता राव यांनी धडक कारवाई करीत रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत ३५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक, मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
तुमसर तालुक्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु आहे. सकाळच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना रेती वाहतुकीचे ट्रक्टर थांबवले. या ट्रक्टर चालकांकडे पाेलिसांनी चाैकशी केली असता त्यांची भांबेरी उडाली.
पाेलिसांनी नवरगाव ते तामसवाडी मार्गावर वाहनांची तपासणी केली. विना परवाना वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर, एकूण ७ ब्रास रेती, ६ मोबाइल जप्त केले. पाेलिसांनी या कारवाईत एकूण ३५ लाख ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.