Breaking News

भारतातील कोणत्या शहरांतील होळी असते अविस्मरणीय?

संपूर्ण देशात हा सण उत्साहाने साजरा केला जातो, तरी भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे या सणाची मजा काही औरच असते. त्या ठिकाणी जाऊन होळी साजरी करायची, रंग खेळायची एक वेगळीच मजा असते. तिथे गेल्यावर तुमची होळीची मजा दुप्पट होते. अशा कोणत्या जागा, शहरं आहेत ते जाणून घेऊया..

मथुरा

होळीचे नाव येताच मथुरेची आठवण येते. येथील होळी सर्वात अनोखी असते. श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेले मथुरा हे होळीच्या सणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे नागरिक द्वारकाधीश मंदिरात गुलालाने होळी साजरी करतात. तुम्ही मथुरेत होळी साजरी करण्यासाठी जाऊ शकता आणि रंगांच्या सणाचा आनंद लुटू शकता.

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूरची होळीही खूप प्रसिद्ध आहे. तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमधील रंगांच्या या उत्सवाचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. या दिवशी संपूर्ण शहर होळीच्या रंगात रंगून जाते. तुम्ही इथे फिरायलाही जाऊ शकता.

वृंदावन

भगवान श्रीकृष्णाची नगरी वृंदावनमध्येही होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. इथली अरपनी होळी खूप प्रसिद्ध आहे. रंगांचा सण साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. वृंदावनात फुलांची होळी खेळली जाते. बांके बिहारी मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पुष्कर

राजस्थानातील पुष्कर शहरातही मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाते. फिरण्यासाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठी गर्दी असते. होळीच्या दिवशी येथील लोक रंगात अक्षरश: रंगून गेलेले असतात. त्यामुळे तुम्हालाही होळी संस्मरणीय बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

About विश्व भारत

Check Also

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *