हिंदू धर्मात चैत्र महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे अनेक सण असतात. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरी केली जाते. त्रेतायुगातील या शुभ दिवशी बजरंगबलीचा जन्म झाला असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात. या दिवशी मंदिरे सजविली जातात आणि ठिकठिकाणी भंडारे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये हनुमान जन्म तारीख आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेवूया…
हनुमान जन्मोत्सव कधी आहे?
हिंदू कॅलेंडर आणि उदया तिथीनुसार, यावेळी चैत्र महिन्याची पौर्णिमा 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी पहाटे 3.26 वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी पहाटे 5.18 वाजता संपणार आहे. उदया तिथीनुसार 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरी केली जाते. या दिवशी प्रभू रामासह बजरंगबली ची पूजा करावी कारण यामुळे बजरंगबली लवकर प्रसन्न होतो.
जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त…
बजरंग बली यांचा जन्म मंगळवारी झाला असे सांगितले जाते. म्हणूनच बजरंग बली यांना मंगलमूर्ती हे नाव देखील दिले आहे. या वर्षी 23 एप्रिलला मंगळवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. 23 एप्रिलला दिवसभर पौर्णिमा असल्याने तुम्ही कधीही बजरंग बलीची पूजा करू शकता. पण शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात. हनुमान जन्मोत्सव पूजेची विशेष वेळ सकाळी 9.14 ते 10.49 यानंतर दुपारी 12.25 ते 2 ही पूजेची विशेष वेळ आहे तर दुपारी 3.36 ते सायंकाळी 5.11 पर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. रात्रीची शुभ मुहूर्त 8:14 ते 9:25 पर्यंत असेल.
हनुमानजयंतीला भाद्रावस योग आहे तरी काय?
भाद्रावस योग असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे. भद्रा म्हणजेच शनीची बहीण या दिवशी पाताळात असेल आणि पृथ्वीवरील सर्व प्रकारचे धार्मिक आणि शुभ कार्यक्रम शुभ होतील. असे म्हटले जाते की जेव्हा भद्रा पाताळात राहते तेव्हा पृथ्वीवरील भक्तांनी केलेली पूजा फायदेशीर आणि पवित्र फलते. या दिवशी सायंकाळी 4.25 वाजल्यापासून भाद्रावस योग आहे. यावेळी बजरंगबलीची पूजा केल्याने साधक आणि संपूर्ण कुटुंबाला शाश्वत फळ मिळण्याचे वरदान मिळण्याची शक्यता आहे.