Breaking News

नितीन गडकरी मंत्रिमंडळात नसणार? : शपथविधी आज

भाजपचे नेते राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन व एस. जयशंकर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, बिप्लब देब, गजेंद्र सिंह शेखावत, ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद जोशी आदींची केंद्रीय मंत्रिपदे कायम राहू शकतील.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, संजय जयस्वाल, राजीव प्रताप रुडी, जितीन प्रसाद, संजय बंडी, केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे थिसूरचे सुरेश गोपी, जितेंद्र सिंह या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

घटक पक्षांमध्ये एच. डी. कुमारस्वामी (जनता दल-ध), अनुप्रिया पटेल (अपना दल), जयंत चौधरी (आरएलडी), चिराग पासवान (एलजेपी), जितन मांझी (एचएपी), ललन सिंह व रामनाथ ठाकूर (जनता दल झ्रसं), राममोहन नायडू, हरीश बालयोगी व दग्गुमाला प्रसाद (तेलुगु देसम) आदींचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेसाठी जनता दल (यु) आणि तेलगु देसम पक्ष या दोन पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती खाती जातील हे पाहावं लागणार आहे.

तेलुगु देसम आणि जनता दल युनायटेडमुळे ‘एनडीए’ बहुमतापर्यंत पोहोचला. तेलुगु देसमने लोकसभाध्यक्ष पदासह माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचे समजते. कृषि मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केला आहे. भाजपवर घटक पक्षांनी दबाव वाढवला असला तरी, विविध क्षेत्रांतील पायाभूत विकासांची मंत्रालये सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे खातेवाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गृह, अर्थ, संरक्षण व परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यावर भाजप ठाम असून लोकसभाध्यक्षपदबाबतही तडजोड केली जाणार नसल्याचे समजते. तेलुगु देसमला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते.

दरम्यान, जनता दलाने (सं) रेल्वे तर, तेलुगु देसमने माहिती-तंत्रज्ञान, रस्तेविकास या खात्यांची मागणी केली असली तरी या खात्यांची राज्यमंत्रिपदे त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

जनता दल व तेलुगु देसम या दोन्ही प्रमुख घटक पक्षांना अनुक्रमे किमान २ आणि ४ केंद्रीय मंत्रिपदे दिली जाऊ शकतील. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जनता दल (ध), राष्ट्रीय लोकदल, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, हिंदुस्तान अवामी मोर्चा, जनसेना, रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांनाही स्थान दिले जाईल. यापैकी अनेक पक्षांनी किमान दोन मंत्रिपदाची मागणी केली असली तरी, मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल असे समजते. दरम्यान, शपथविधीचे काँग्रेस नेत्यांना अद्याप आमंत्रण मिळाले नसल्याचे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

कोणत्या घटकपक्षाचा होणार विचार?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

घटक पक्षांच्या खात्यांच्या मागण्या

● तेलगु देसम : लोकसभाध्यक्ष, रस्तेविकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान व शिक्षण

● संयुक्त जनता दल : कृषि, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास

● जनता दल (धर्मनिरपेक्ष) : कृषि, पंचायत राज, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास

● शिवसेना शिंदे : अवजड उद्याोग

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना मंत्रिमंडळात स्थान असेल किंवा नाही, यावर अजूनही शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समजते.

About विश्व भारत

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून लढणार : ‘विश्व भारत’ची बातमी ठरली खरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच …

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीची भाजपमधून का झाली हकालपट्टी?आशिष जैस्वालला विरोध

जाहीरपणे कोणी महायुतीच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून वक्तव्य किंवा बंड पुकारले जात असेल अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *