देशातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात : वर्षाला ३३ हजार मृत्यू

सोयी-सुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.

भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू वायू प्रदुषणामुळे होत आहेत. तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रदूषणाला बळी पडावे लागत आहे, असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो. यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे. याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.

 

‘लँसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार वरील दहा शहरातील हवेत पीएम२.५ चे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबाबत पीएम२.५ ची जी मर्यादा आखून दिली आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाण असल्याचे अहवालात म्हटले आहे. संशोधकांनी सदर निष्कर्ष काढण्यासाठी २००८ ते २०१९ या वर्षांतील मृत्यूच्या नोंदी तपासल्या. या शहरांतील ३.६ दशलक्ष मृत्यूच्या कारणांची तपासणी केली गेली. त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

 

वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००, चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे. दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.

About विश्व भारत

Check Also

Voter ID विसरलात?तरीही करता येणार मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी आज, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. यावेळी महाविकास आघाडी, महायुती, तिसरी …

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *