महाराष्ट्र : काँग्रेसचे ७ आमदार निलंबित?

क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई

त्यासोबत या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या ७ आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आमदारांवर काही मोठी कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

काँग्रेस हायकमांडकडून विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तो प्रकार फार गांभीर्यांने घेण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्लीत सुद्धा एक बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ ते ७ आमदारांवर काँग्रेस निलंबनाची कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

 

काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नसीम खान, विश्वजीत कदम यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

 

विधानसभेच्या निवडणुकीबद्दल चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानलं जात आहे. या बैठकीत आगामी काळाती विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील किती जागांवर दावा करणार, याबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *