१९ जुलै ते २२ जुलै दरम्यान भूमी अभिलेख विभागीय ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार असल्याने भूमी अभिलेख विभागाचे सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसाच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रक, फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येणार नाहीत अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयकानी दिली. सध्या ई-पीक पाहणी, खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे १९ जुलैपूर्वीच काढावीत. जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही. २३ जुलैपासून सर्व पोर्टल पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.
Check Also
राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड
महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …
अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा
विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …