Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून विधानसभा लढणार : टेकचंद सावरकर यांचा पत्ता कट

नागपूरमधील कामठी-मौदामध्ये तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देखील २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यंदा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला. विजयाची खात्री असलेला उमेदवार म्हणून बावनकुळे यांची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २००४ मध्ये प्रथमच तेथे बावनकुळे यांनी भाजपला विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली होती. २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे ऊर्जा हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. त्यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रीपदही होते. याआधारे त्यांनी मतदारसंघावरील पकड अधिक घट्ट केली. असे असताना २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून साऱ्यांनाच धक्का दिला. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयापुढे मान तुकवत बावनकुळे यांनी पक्षाने दिलेले उमेदवार टेकचंद सावरकर यांच्यासाठी काम करत त्यांना निवडून आणले. मात्र, याचे फळ त्यांना नंतर मिळाले. २०२२मध्ये त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदीही नेमण्यात आले. तेव्हापासून बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या. मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२४ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेत पक्षाचा झालेला पराभव लक्षात घेता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पक्षांकडून बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी विद्यामान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापले जाऊ शकते. २०१९ मध्ये भाजपने बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते हे येथे उल्लेखनीय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कामठी विधानसभा मतदारसंघांत माघारला होता. ही बाबही विद्यामान आमदार सावरकर यांच्या विरोधात जाऊ शकते.

बावनकुळे पुन्हा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरल्यास या मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी पारंपरिक लढत होऊ शकते. कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. कॉंगेस नेते सुनील केदार आणि मुकूल वासनिक यांची भूमिका उमेदवार निश्चित करताना महत्वाची ठरणार आहे.कामठी-मौदात सध्या भाजपचे हे विद्यमान आमदार आहेत.

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त!

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त! टेकचंद्र …

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *