Breaking News
Oplus_131072

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा कारमध्ये असल्याचे उघड : प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

सध्या गाजत असलेल्या नागपूरच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक महत्वाची माहिती उघड केली. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) धरमपेठमधील लाहोरी हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराला ते ऑडी मोटारीतून बाहेर पडले. सेंट्रल बाजार रोडवरुन भरधाव जात असताना सेंटर पॉईंट हॉटेलसमोर त्यांनी जीतू सोनकांबळे याच्या मोटारीसह तीन वाहनांना धडक दिली.

अपघात झाला त्यावेळी संकेत दोन्ही मित्रांसह कारमध्येच होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले होते. संकेतचे नाव एफआयरमध्ये नव्हते. सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी संकेत कारमध्ये नव्हता, अशी माहिती दिली होती. सोमवारी रात्री संकेतला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. मात्र, त्याची वैद्याकीय चाचणी करण्यात आली नाही. पोलिसांनी केवळ अर्जुन हावरेवरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे संकेतला वाचवण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मंगळवारी पोलीस उपायुक्त मदने यांनी संकेतही अपघातावेळी कारमध्येच असल्याचे सांगितले. अपघात झाल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून कारचालक अर्जुनला अटक केली. संकेत आणि रोनित यांची चौकशी करण्यात आली. गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावण्यात येईल, असे मदने यांनी स्पष्ट केले.

सेंट्रल बाजार मार्गावर वाहनांना धडक दिल्यानंतर संकेत व त्याचे मित्र कोराडीकडे पळून जात असताना गाडीने मानकापूर चौकात टी पॉईंटजवळ आणखी एका मोटारीला धडक दिली. त्यामुळे चिडलेल्या कारमालकाने पाठलाग करुन मानकापूर उड्डाणपुलावर त्यांना अडविले व संकेतसह तिघांनाही मारहाण केली. अपघातग्रस्त कारमालकाने रोनित आणि अर्जुन यांना तहसील पोलीस ठाण्यात नेले तर संकेत एका मित्राच्या वाहनाने घरी निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहेत. यात अपघाताची भीषणता दिसते.

चालक काँग्रेस कार्यकर्त्याचा मुलगा?

कार चालक अर्जुनचे वडील जितेंद्र हावरे हे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अर्जुन आणि रोनितला तहसील पोलीस ठाण्यात आणल्यानंतर धडक बसलेल्या कारचे मालक व अर्जुनचे वडील तेथे आले होते व त्यांनी आपसात प्रकरण मिटवल्याचा दावा पोलीस उपायुक्त मदने यांनी केला.

About विश्व भारत

Check Also

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे

चीफ जस्टिस का आभारी हूं कि उन्होंने गणेश जी को तारीख नहीं दी! उद्धव ठाकरे …

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त!

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त! टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *