Breaking News

तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी निलंबित

श्रीगोंद्यात चर्च दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या जमीनीची बेकायदेशीर कागदपत्राआधारे तहसीलदारांकडून जमीन मालकी हक्क नाव बदलण्याची परवानगी घेऊन संबंधीत जमीन विक्री करण्यात आली होती. याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी जमीन विक्रीसाठी मालकी हक्क बदलणारे, जमीन खरेदी-विक्री करणारे, तसेच श्रीगोंदा येथील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने मालकी हक्क बदलाच्या निर्णयाकडे प्रांताधिकार्‍यांकडे अपील तर न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर प्रांताधिकार्‍यांनी तहसिलदारांच्या मालकी हक्क बदलणेबाबतच्या आदेशाला स्थगिती दिली होती. श्रीगोंदा शहरालगत चर्चची सुमारे 30 एकर जमीन (Land) आहे. यात शाळा, प्राथमिक शाळा, कर्मचारी वसाहत, चर्च असताना यातील 28 एकर जमीनीची विक्री चर्चच्या परवानगी शिवाय झाली. यात इंडियन कॅनेडियन प्रेस ब्रिटेरियन तर्फे मॉडरेटर दिपक नामदेव गायकवाड, संदिपान किसन तुपारे यासह तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांचे संगमन मत असल्याचे दि ख्राईस्ट चर्च ने केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

तहसीलदारांकडे चर्चच्या जमीनीचा मालकी हक्क बदलण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला. नाव बदलणे आदेशानंतर त्याचवेळेस जमीन विक्री संदीपन तुपारे यांना केली. तहसीलदारांकडील नाव बदलणे आदेश तातडीने मंडलाधिकार्‍यांनी मंजूर करत क्षेत्रावरील नाव बदलले. तहसीलदार यांनी तातडीने निर्णय घेत कागदपत्रे तपासणी न करता तसेच दि चर्च ऑफ ख्राईस्ट संस्थेच्या पदाधिकार्‍यांना सुनावणीसाठी म्हणणे सादर करण्यासाठी वेळ न देता एकतर्फी आदेश दिला आणि आदेश मिळाल्यावर तातडीने मंडलाधिकारी, तलाठी यानी नोंद केल्यामुळे तातडीने जमीन विक्री झाली. तहसीलदारांच्या या एकतर्फी आदेशामुळे संस्थेचा जमीनीवरील हक्क हिरावला गेला असल्याचे तक्रार यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ही जमीन सेक्रेटरी ऑफ ऑस्टेलियन चर्चेस ऑफ ख्राईस्ट ओव्हरसिज मिशन बोर्ड कॉर्पोरेटेड इन इंडिया मिशन यांची होती. त्यांनी ही मिळकत, तसेच इतरही अनेक मिळकती या भारतातून मायदेशी परत जात असताना दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे कागदोपत्री दिलेली आहे.

 

About विश्व भारत

Check Also

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यानी घेतले पत्नीच्या खात्यात पैसे

जिल्हाअंतर्गत विकासकामे मंजूर करण्यासाठी पत्नीच्या खात्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे …

रजिस्ट्री दफ्तरों में भारी भीड़, सर्वर डाउन के नाम पर भ्रष्टाचार

रजिस्ट्री दफ्तरों में भारी भीड़, सर्वर डाउन के नाम पर भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *