Breaking News

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात नागपूरकर कुटुंब…!

जम्मू-काश्मीरच्या पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळख ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून अतिरेक्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केले. काश्मिरमध्ये यंदा मोठ्या संख्येने देशविदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पहेलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरनचे गवताळ पठार हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक उन्हाचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना आडोसा घेण्याचीही संधी मिळाली नाही. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला.

 

बैसरन येथे फक्त पायी जाता येते, हे एक अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. घटनेनंतर लगेचच, पोलिसांचे एक पथक लष्कर आणि निमलष्करी दलांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकांना तेथून काढले. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी पर्यटकांवर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर शेवटचा हल्ला केला होता, ज्यामध्ये दोन पर्यटक जखमी झाले होते. ती घटना देखील पहेलगाममध्येच घडली होती.

 

या हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप डिसले व अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील तीन पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी तेथे एक नागपूरकर कुटुंबसुद्धा होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरून उड्या मारल्या आणि त्यात घसरून सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा आहेत. तिघेही सुखरूप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. इतर जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे रहिवासी आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपूर ते सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर थेट विमानसेवा सुरु होणार!

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या …

RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन

RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जयपुर, 30 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *