Breaking News

फ्लॅटच्या खिडकीतून पडून बाळाचा मृत्यू

७ महिन्याचा बाळाचा २१ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी विरारच्या बोळींज येथील जॉय विले परिसरात ही दुर्घटना घडली. बाळाची आई खिडकी बंद करत असताना तिचा तोल गेला आणि तिच्या खांद्यावरून बाळ खाली पडले.

विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत आहे. या इमारतीत २१ व्या मजल्यावरील २१०४ या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दांपत्य राहतात. त्यांना ७ महिन्यांचे बाळ होते. बुधवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दांपत्याला ७ वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला ७ महिने पूर्ण झाले होते.

बुधवारी विकी सदाने नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. बाळाला बघण्यासाठी काही नातेवाईक घरात आले होते. इतर नातेवाईक घरात होते. महिला खिडकी बंद करताना तिचा तोल गेला आणि खांद्यावरील बाळ खाली पडले अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About विश्व भारत

Check Also

सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?

सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला दूरध्वनी किंवा व्हॉटस्अच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवीन ‘डिजिटल …

विवाह के नाम पर खूबसूरत लुटेरी महिला गिरोह का भंडाफोड

विवाह के नाम पर खूबसूरत लुटेरी महिला गिरोह का भंडाफोड़ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *