बदलते हवामान : दिवा दिवाळीचा अन वृक्षलागवडीचा!🪔
बदलत्या हवामानामुळे राज्यासह संपूर्ण देशाला अतिवृष्टीने जनुकाय झोडपून काढले की काय अशी परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आपल्याला पहायला मिळाली.या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्याची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील माती सुध्दा वाहुन गेली,पिके वाहून गेलीत, मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांची जिवित हाणी झाली, त्याचप्रमाणे मानवी जिवित हाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात झाली आणि हा संपूर्ण प्रकार बदलते हवामान व ग्लोबल वॉर्मिगमुळे निर्माण झालेला आहे.याहीपुढे आपण जाऊन पहाले तर जंगलातील अनेक पशुपक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू सुध्दा झाला.याला आपण म्हणजेच देशाची १४० कोटी जनता दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून या विनाशाला काही प्रमाणात रोखु शकतो. पर्यावरणाची ढासळती परीस्थिती पहाता फटाक्यांपेक्षा “पनत्याच्या”प्रकाशन दीवाळी साजरी करावी. मानवाच्या अतीरेकामुळे निसर्गाचे संतुलन दीवसें दीवस ढासळतांना दीसत आहे.यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होवून मानवाच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.वाढते वायुप्रदूषण पहाता अनेक राज्यांत प्रदूषित फटाक्यांवर बॅन लावलेला आहे. यावर महाराष्ट्र सरकारने सुध्दा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यात पराली जाळत असल्यामुळे दिल्लीमध्ये गॅसचेंबर सारखी परीस्थिती नेहमीच निर्माण होत असते. त्यामुळे दिल्लीमध्ये यावर्षी फटाक्यांवर बंदी असल्याचे सांगण्यात येते.दीवाळीला देशात करोडो रुपयांचे फटाके फुटतील.परंतु यामुळे वाढत्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात भर पडु शकते.फटाक्याबद्दल हायकोर्टाचे व सुप्रिम कोर्टाचे अनेक आदेश आलेत.परंतु ते फक्त कागदावरच दिसतात. प्रदुषनाच्या बाबतीत फक्त कायद्याला धरून चालता येणार नाही तर नागरिकांनी प्रदुषनाच्या बाबतीत जनजागृती करून आवाज उठविला पाहिजे.भारतात प्रदुषनाच्या बाबतीत अनेक वर्षांपासून जनजागृती सुरू आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.त्यामुळे सरकारी माहीतीनुसार यावर्षी फटका विक्री कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.तरीही वायुप्रदूषण मानव, पशु-पक्षी व जिवजंतु यांच्यासाठी अत्यंत घातक आहे आणि विनाशकारी आहे.आज वायुप्रदूषणामुळे अनेक पशुपक्षी, औषधीयुक्त वनस्पती लुप्त झाल्याचे दिसून येते व काही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.त्याचप्रमाणे जगात वाढत्या प्रदूषणामुळे ३० टक्के वृक्षप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि विविध देशांतील १४२ प्रजाती याआधीच पृथ्वीतलावरून लुप्त झाल्या आहेत.यावरून स्पष्ट होते की प्रदुषणाने भयावह रूप धारण केले आहे. सोशल मीडियाने आपल्या नेटवर्क करीता देशात लाखोच्या संख्येने टॉवर उभे केल्याचे दीसुन येतात. याच्या रेडिएशनमुळे विपरीत परिणाम मानव,पशुपक्षी व संपूर्ण जिवजंतुवर मोठ्या प्रमाणात होतांना दीसतो.म्हणेज जेवढ्या सुखसुविधा त्यापेक्षा जास्त सर्वांचेच(मानव, पशुपक्षी, पर्यावरण) याचे आयुष्यसुध्दा दिवसेंदिवस कमी होत आहे हीबाब यावरून सिद्ध होते. त्यामुळे प्रदुषन टाळण्यासाठी जे कोणते उपाय आहे ते नागरिकांनी अंगीकारले पाहिजे.आज निसर्ग व पर्यावरणाला काळीमा फासण्याचे काम मुख्यत्वेकरून वायुप्रदूषणाने केले आहे व यात भर टाकली जलप्रदूषणनाने कारण देशातील अनेक कारखान्यांचे पाणी थेट नद्यांना जावुन मिळत आहे यामुळे दुषित पाण्याचे प्रमाण सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे आज मानव व पशुपक्षांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.त्याचप्रमाणे जंगल तोडीमुळे जंगल संपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळेच आज अनेक गावांत व शहरांमध्ये हिंसक पशु प्रवेश करतांना दीसतात याला जबाबदार आपणच आहोत.म्हणजेच मानवाने पशुपक्ष्यांच्या व निसर्गाच्या घरावर आक्रमक केल्याचे स्पष्ट दिसुन येते.पाकिस्तान दरवर्षी हिवाळ्यात म्हणजेच ऐन दिवाळीच्या फटाक्यांचा गैर फायदा पाकिस्तानी आतंकवादी घ्यायचे.परंतु सध्याच्या परिस्थितीत भारताने सिन्दुर ऑपरेशन नंतर संपूर्ण जगात पाकिस्तानची नाकेबंदी केलेली आहे व त्याची जागा त्याला दाखविली आहे.त्यामुळे पाकिस्तान तिलमिला झालेला आहे व त्याची हरप्रकारे कोषीश आहे की एलओसीच्या मार्गे भारतात आतंकवादी पाठवून शांतता भंग करायची परंतु भारतीय जवानांनी आतंकवाद्दांची संपूर्ण नाकेबंदी करून यमलोक पाठवीण्याचे काम सुध्दा युद्धपातळीवर सुरू आहे.दीवाळी हा भारतीयांचा महत्त्वपुर्ण सन आहे.या सणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पहायला मिळेल.परंतु यात “जहर”घोळण्याचे काम आतंकवादी करू शकतात याला नाकारता येत नाही. आतंकवाद्दांना जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे यात शंका नाही परंतु नागरिकांनी फटाके फोडताना सतर्कता बाळगली पाहिजे. कारण आतंकवादी दीवाळीच्या फटाक्यांचा फायदा घेवुन घृणास्पद कृत्य करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध रहाण्याची गरज आहे. दीवाळी सण म्हटला की फटाके आलेच कारण फटाक्यांशिवाय दीवाळी अधुरीशी वाटते.त्यामुळे दीवाळीला घरोघरी फटाके फोडले जातात.परंतु फटाके फोडताना “कमी आवाजाचे” व कमी फटाके फोडले पाहिजे. जेणेकरून ध्वनी प्रदुषण व वायुप्रदूषण होणार नाही याची दक्षता जनतेनेच स्वतःहुन घ्यावयास पाहिजे.त्याचप्रमाणे सुप्रिम कोर्टाने व सरकारने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. दिनांक १९ आक्टोंबर २०१८ ला ध्वनी प्रदूषणामुळे अमृतसर येथील महाभयानक घटना घडली होती ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.ही घटना भारतासह संपूर्ण जगाला काळीमा फासणारी व अंधारात नेणारा अपघात ठरला.कारण रावण दहणाच्या फटाक्यांचा आवाज व रेल्वे येण्याची वेळ “एकत्र” झाली.त्यामुळे नागरिकांना रेल्वेचा आवाजच लक्षात आला नाही.त्यामुळे रेल्वेट्रॅकवर बसुन रावण दहनाचा आनंद घेणारे ७० हुन अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि हा प्रकार फटाक्यांच्या ध्वनीप्रदुषणाने व आवाजाने झाला.त्यामुळे नागरिकांना माझी नम्रविनंती आहे की या सर्व घटना लक्षात घेऊन फटाके फोडावेत. मुख्यत्वेकरून लहान मुलांना फटाक्यांपासुन दुर ठेवलेले बरे कारण फटाक्यांच्या दुर्घटना लहान मुलांच्या बाबतीत जास्त होतांना दिसतात. देशात फटाक्यांमुळे दरवर्षी १५ हजारहून अधिक लोक आपली “दृष्टी” गमावतात.त्यामुळे फटाका दीसायला जीतका चांगला त्यापेक्षा जास्त तो “घातक, उग्र व धोकादायक सुध्दा आहे” ही बाब नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे.त्याचप्रमाणे लहान असो किंवा मोठा व्यक्ती असो त्यांनी हातात फटाके फोडु नये त्यामुळे दुर्घटना ओढावु शकते.माझ्यामते फटाके फोडने चुकीचे नाही.परंतु ध्वनी प्रदुषण, वायुप्रदुषण व दुर्घटना होणार नाही याची काळजी जनतेने अवश्य घ्यावयास पाहिजे.संपुर्ण भारतात दीवाळीच्या सणाला “अरबो रूपयांचे”फटाके फुटणार यात शंका नाही. परंतु हे अरबो रूपये “धुळासारखे उडुन जातील” पण त्या धुळातील प्रत्येक कणाचे प्रदुषन मात्र “मानवाच्या, पशुपक्षांच्या व संपूर्ण जीवजंतूच्या काळजात व शरिरात”घर करून राहील ही बाब मानव,पशुपक्षी व जिवजंतु यांना घातक ठरू शकते याला नाकारता येत नाही.आजच्या परीस्थितीत “बारूद” ही संपूर्ण जगाची अत्यावश्यक वस्तु बनली आहे.त्यामुळे आज संपूर्ण जग “बारूदच्या”ढीगाऱ्यावर बसलेले दीसुन येते.यामुळे जगात आपल्याला युद्धजन्य परीस्थिती पहायला मिळते.याचे जिवंत उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा, अझरबैजान-आर्मेनिया युद्ध,गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया, इजरायल-इराण,हमास-इजरायल युद्ध अत्यंत भयावह स्थितीत येवून ठेपले आहे,चीन -तैवान संघर्ष सुरूच आहे आणि आता ७ ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेले इजरायल विरूद्ध हमास आतंकवाद्यांचा संघर्ष टोकाला पोहोचलेला असुन आताही सुरूच आहे.यात लाखोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे.त्याचप्रमाणे अनेक देशांत मोठ्या प्रमाणात गृह युद्ध सुध्दा दिसून येते.म्हणजेच आज सर्वत्र बारूदचा शिडकाव दिसून येते.कोणतीही “बारूद” असो ती विनाशाकडे नेतांना दीसत आहे.त्यामुळे फटाके सुध्दा बारूदच आहे करीता कमीत-कमी फटाके कसे फोडता येईल याकडे नागरिकांनी लक्ष दीले पाहिजे.आपण दीवळीला अनेक पक्वांन बनवीतो, फटाके फोडतो, छोटे-छोटे किल्ले बनवितो. परंतु यात आणखी एक भर टाकुन या दीवसाला प्रत्येकाने आपल्या घरासमोर “एकतरी झाड” लावावे जागा नसेल तर एखाद्या कुंडीत झाड लावुन दीवाळी साजरी करावी.कारण आज बदलते हवामान पहाता वृक्षलागवड होने अत्यंत गरजेचे आहे मग ती कोणत्याही रूपात झाली तरी चालेल.यामुळे प्रदुषन रोखण्यास आपणा सर्वांना यश येईल व करोडो झाडे लावल्या जातील.याचा फायदा पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात होईलच.यामुळे”गुरांना चारा व मानवाला वारा आणि सर्वांना सावली मिळेल”. फटाके एकाक्षणात संपतील परंतु झाड जर लावले तर ती एक आठवण अनंत काळपर्यंत राहील व आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभेल.अशाप्रकारे हरीत दिवाळी निर्माण होईल.असे जर संपूर्ण भारतात झाले तर पर्यावरणाच्या बाबतीत”दिवाळी हा ऐतिहासिक सण”समजल्या जाईल. पनत्यांचा एवढा प्रकाश पडुद्दा की, सर्वांच्या जीवनात “प्रकाशमय जोत जळत राहीली पाहिजे”आपआपल्यापरीने नियमांचे पालन करून प्रदुषणावर सर्वातोपरी मात करावी व काळाच्या गरजेनुसार हरित दिवाळी साजरी करावी.असे जर झाले तर यावर्षीचा दिवाळी सण सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाईल. “पर्यावरण सुरक्षीत तर मानव व पशु-पक्षी सुरक्षीत आणि मानव सुरक्षीत तर देश सुरक्षित” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.कारण दिवसेंदिवस जगभरातील हवामानातील वाढता बदल अत्यंत धोकादायक स्थितीत येवून ठेपला आहे.यामुळे याचा फटका जगाला भोगावा लागत आहे. हवामानातील आमुलाग्र बदल पहाता विविध स्वरूपातील विक्राळ रूप आपल्याला पहायला मिळत आहे यात चक्रीवादळ, अतीवृष्टी, पुरपरिस्थिती, सुनामी,भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक,भुस्खनण,अती उष्णता,दुष्काळ सोबतच दिवसेंदिवस वाढती समुद्राची पातळी यामुळे जगाला मोठा धोका निर्माण झाला आहे व मोठे नुकसान होत आहे.यावरून स्पष्ट होते की निसर्गाला टीकवुन ठेवने काळाची गरज आहे. त्यामुळे दिवाळीचा सण लक्षात घेता प्रत्येकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा “संकल्प”केला पाहिजे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद.
✍️ लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार,
( स्वतंत्र पत्रकार )
(चौथास्तंभ पुरस्कृत मुक्त पत्रकार-२०१९)
६३ बी शिवनगर, नागपूर -९
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.