भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. ज्योतिषी सांगण्याच्या नावाखाली त्याने भोंदूगिरी सुरू केली होती. या भोंदूगिरीमार्फत त्याने अनेक महिलांना आपल्या वासनेचे बळी बनवले. एवढंच नव्हेतर ओश्नो जलच्या नावाखाली त्याने अत्यंत घ्रुणास्पद प्रकार केला असून महिलांचं शारीरिक शोषणही केलं. कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. दरम्यान, या व्हिडिओंमध्ये ज्या महिला दिसत आहेत त्या कुठेही प्रतिकार करताना दिसत नसल्याचा दावाही सोशल मीडियावरून करण्यात येत होता. या दाव्यांबाबत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशाताई मिरगे यांनी काही अंदाज लावले आहेत. त्या एका चॅनेलशी बोलत होत्या.
आशाताई मिरगे म्हणाल्या, “पुरुष समाज आणि काही स्त्रियाही सोशल मीडियावर विचारत आहेत की त्या व्हिडिओमध्ये महिला कुठेही विरोध करताना दिसत नाहीत. मागच्या दीड दिवसांत मी सोशल मीडियावर हेच वाचतेय. ते एन्जॉय करतायत असं लोक लिहित आहेत. हे सारं वाचून दुःख होतं. मी स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.”
कफ सिरपमध्ये बाबा मूत्र टाकायचा
“हा बाबा ओश्नो जल नावाचं लिक्विड स्वतः तयार करायचा. ओश्नो जल म्हणजे काय? एक कफ सिरप असतं. तुम्हाला सर्दी पडसं झालं, डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर कफ सिरप देतात. औषध घेतल्यानंतर डॉक्टर गाडी चालवायलाही मनाई करतात. कारण, हे औषध घेतल्यानंतर गुंगी येऊ शकते. डॉक्टर म्हणून मला कळतं की काही औषधांमुळे थोड्यावेळांपुरता गुंगी येते. हा त्या कफ सिरपमध्ये याचं वीर्य किंवा मूत्र टाकायचा. तसंच, टॅब्लेट वायग्रा पाण्यात कुटून टाकायचा. वायग्रा म्हणजे काही वेळापुरता पुरुष असो किंव स्त्री यांची लैंगिक भावना उद्दीपित करण्याकरता वापरण्यात येणारं ड्र्ग्स”, अशी माहिती आशाताई मिरगे यांनी दिली.
राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा गंभीर आरोप
बाबा योनीची पूजा करायचा
“आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल की आपला कौटुंबिक क्वालिटी वेळ स्क्रीन टाईममध्ये परावर्तित झाला आहे. क्वालिटी संवाद कमी झाला आहे. महिला भावनिकिरत्या कमकुवत असतात. मग आम्हाला भावनिक आधार लागतो. घरात पतीला, पित्याला, पुत्राला घरातील बाईसाठी वेळ मिळत नाही. आणि एखादा माणूस म्हणतो की मी इथे तुमे प्रश्नच सोडवायला बसलो आहे. तिथे गेल्यानंतर हा बाबा महिलांना सांगायचा की तुम्हारे सब फसाद की झड तुम्हारे योनी मे है. मग मी तुझी योनी पूजा करतो”, असं आशाताई मिरगे म्हणाल्या.
…म्हणून बायका प्रतिसाद देताना दिसत होत्या
“हा बाबा योनी पूजेच्या आधी मंतरलेलं पाणी महिलांना द्यायचा. हे पाणी प्यायल्याने महिलेला थोड्यावेळापुरती गुंगी येणार. हा तिच्या कानात बोलत असतो, तिकडे वायग्रामुळे तिची लैंगिक भावना उद्दीपत होणार. तुम्ही ज्याला वशीकरण म्हणता त्याला आम्ही हिप्नोटिजम म्हणतो. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे एखादा लैंगिक संबंधाकरता तयार असलेला पुरुष आजूबाजूला भेटला की ती प्रतिक्रिया देणार, असा माझा अंदाज आहे”, असं आशाताई मिरगे म्हणाल्या.
त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की महिला त्या बाबाला प्रतिक्रिया देत आहेत किंवा ती एन्जॉय करत पण ती खरंतर ट्रॅप अडकलेली असते. ती त्या चक्रात अडकली जाते. त्यामुळे एकदा झाल्यानंतर तिला पुन्हा बोलावलं जातं, असंही मिरगे यांनी स्पष्ट केलं.
विश्वभारत News Website