Breaking News

राज्यात १ जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह

Advertisements

मुंबई : राज्यात उद्यापासून कृषि दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.                                       पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करीत 1 ते 7 जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. 1 जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी झ्र कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *