Breaking News

कीटकनाशक फवारणीसंबंधी दिशानिर्देश जारी

Advertisements

यवतमाळ  : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी [crop insectcide spray] सुद्धा होईल. शेतकरी, शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी निर्देर्शित केले आहे.
सदर जनजागृती अभियान राबविण्याकरीता तालुका व ग्रामस्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीची स्थापना तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक व गटविकास अधिकारी हे समिती सदस्य राहणार आहेत. तर ग्रामस्तरीय समिती सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आली असून कृषी सहाय्यक हे सदस्य सचिव राहतील. तसेच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व आशा वर्कर हे सदस्य राहतील.
समितीमार्फत गावातील फवारणी करणाºया शेतमजुरांना मागणीनुसार संरक्षक किट वाटप करण्यात येईल. विषबाधा जनजागृती अभियानअंतर्गत सुरक्षित फवारणी कशी करावी याबाबत सोशल डिस्टन्सिंगचे (शारीरिक दूरता) नियम पाळून प्रचार व प्रसिद्धी केल्या जाईल. तसेच, कृषि अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त याद्यांप्रमाणे कीटकनाशक फवारणी करणारे शेतकरी, शेतमजुर याच्या आरोग्य तपासणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. लाल रंगाच्या त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांऐवजी पर्यायी कीटकनाशक वापरण्याकरिता शेतकºयांना प्रवृत्त करणे, संरक्षक किट न वापरता फवारणी करतांना आढळुन आल्यास त्यांना समज देऊन दुष्परिणामाची जाणीव करुन देण्याचे कामही समितीतर्फे करण्यात येणार आहे.
शेतकºयांना सूचना करताना फवारणीच्या अगोदर स्वच्छ आंघोळ करणे, पोटभर न्याहरी करणे, फवारणीदरम्यान बिडी, सिगरेट, तंबाखू, खर्रा, दारू आदी मादक पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे. फवारणीचे कामकाज आटोपल्यावर साबनाने स्वच्छ आंघोळ करूनच जेवण करावे. फवारणी ही वाºयाच्या दिशेने करावी जेणेकरून स्प्रे पंपातून उडणारे तुषारकण अंगावर उडणार नाही. फवारणीचे कामकाज हे सकाळी अथवा दुपारनंतर उतरत्या उन्हाच्या वेळी करावे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात फवारणीचे कामकाज टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावामध्ये विषबाधा होताच बाधितास वाहनाद्वारे रुग्णालयामध्ये तात्काळ उपचराकरीता दाखल करणे, विषबधा झालेल्या व्यक्तीने कोणकोणते किटकनाशकांची किती प्रमाणात फवारणी केली याची माहीती त्वरीत वैद्यकीय अधिकाºयास देण्याबाबत समितीस सूचित करण्यात आले आहे. कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषिकेंद्रधारक यांनादेखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *