Advertisements
पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 जणांचा मृत्यू झाला होता.
Advertisements
Advertisements