मुंबई : हिंदीचित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईच्या वांद्यार्तील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांच्यावर 20 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू होता़ मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होते; परंतु गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. शुक्रवारी चारकोप येथील मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. 50 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सरमधूनही काम केले. यानंतर नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेत गीता मेरा नाम चित्रपटातून नृत्यदिग्दर्शिका म्हणून कारकीर्द घडवली. सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल यांच्यसह अनेक अभिनेत्रींसाठी नृत्य दिगदर्शन केले आहे.
चाळीस वर्षांच्या काळात सरोज खान यांनी दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. देवदास (नवा) चित्रपटात ‘डोला रे डोला’ आणि 2007 मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ मधील ‘ये इश्क…’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या.
Check Also
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर
राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …
ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …