चीनला ९०० कोटींचा झटका, हिरो सायकल चालली ‘या’ देशात

नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबत केलेली तब्बल ९०० कोटींचा मोठा करार रद्द केला आहे.
लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील तणाव आणि या तणावरून २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनची आर्थिक नाकेबंदी सरकारने सुरू केली आहे. अशातच हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने चिनी कंपनीशी केलेला ९०० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार येत्या तीन महिन्यात पूर्ण केला जाणार होता. दुसरीकडे हिरो कंपनीने सायकलचे सुटे भाग बनवणाºया लहान कंपन्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. विशेष त्यांना हिरो कंपनीत समाविष्ट होण्याची आॅफर देण्यात येत आहे. यातून हिरो कंपनीने स्वदेशी कंपन्यांना चालना देण्याचा प्रयत्नही सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हिरो सायकलने चीनसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद केला असतानाच कंपनी आता जर्मनी आपला प्रकल्प (प्लान्ट) सुरू करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. जर्मनीतील या प्रकल्पातून संपूर्ण युरोपात हिरो सायकलचा पुरवठा केला जाईल.

About Vishwbharat

Check Also

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …

नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य

नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *