Breaking News

भाजपा कार्यकारिणीत निष्ठावंतांनाच स्थान

Advertisements

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नवी कार्यकारिणी घोषित केली असून यात काहीसा अपवाद वगळता निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले आहे.
ूमागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांच्याशिवाय अनेक वर्षे पक्षात काम करत असलेल्यांनाच कार्यकारणीत जागा देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा मेगाभरतीचा वेग ओसरला असून निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच अधिक वरचष्मा दिसून आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही, हे विशेष. त्यामुळे आता हाताशी सत्ता नसली तरी पक्षात मात्र नागपूरी ‘हात’च अधिक वजनदार ठरला आहे.
नागपुरातून बावनकुळे, डेहनकर
नागपूर : भाजपा प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला बºयापैकी स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली असून अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. याशिवाय प्रदेश कार्यसमितीतील राज्यभरापैकी आठ टक्के निमंत्रित सदस्य नागपूर जिल्ह्यातीलच आहेत.
जाहीर केलेल्या यादीत विविध १८ सेलच्या पदाधिकाºयांचीही नावे आहेत. यातील पाच सेलमध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच पदाधिकाºयांची संयोजक-सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे. यात संजय भेंडे (सहकार सेल), कल्पना पांडे (शिक्षण सेल), मिलिंद कानडे (आर्थिक सेल), शाम चांदेकर (विणकर सेल), जयसिंग चव्हाण (दिव्यांग सेल) यांचा समावेश आहे. संजय फांजे यांच्याकडे प्रदेश कार्यालय सहमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश कार्यसमिती तसेच प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यांचीदेखील यादी जाहीर केली. यात अनुक्रमे जिल्ह्यातील पाच व अकरा सदस्यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी खासदार दत्ता मेघे व माया इवनाते यांचा समावेश आहे. डॉ. रामदास आंबटकर, अनिल सोले, नंदा जिचकार, डॉ.मिलिंद माने, डॉ. राजीव पोतदार यांचा प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून समावेश केला आहे.
याशिवाय प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यांत सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, नाना शामकुळे, श्रीकांत देशपांडे, अरविंद शहापूरकर, रमेश मानकर, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर दिवे, राजीव हडप, सुधीर पारवे, ओमप्रकाश यादव यांना स्थान मिळाले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *