Breaking News

हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Advertisements

मुंबई : महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल आजारी पडू शकते. आपण सलूनला परवानगी दिली आहे तीसुद्धा केवळ केस कापणे व हेअर डायसाठी. जिमदेखील बंदच ठेवले आहेत. कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका, अशी सूचनाही यानिमित्ताने केली.
स्वयंशिस्तही महत्त्वाची : पर्यटनमंत्री
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरू करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली़ कोरोनानंतर हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *