मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस उपसमितीचे सदस्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, वन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपसमितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे उपस्थित होते.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …