Breaking News

विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

Advertisements

विकास दुबे : शुक्रवार ते शुक्रवार

Advertisements

नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उज्जैन-कानपूर मार्गावर साडेसहाच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केल्यानंतर कानपुरात आणले जात होते. मार्गात उत्तर प्रदेश एसटीएफचे वाहन उलटले़ यावेळी दुबेने पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले़ मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने एन्काऊंटरमध्ये तो मारल्या गेला़ यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तत्पूर्वी पोलिसांनी गुरुवारी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. येथील महाकाल मंदिरातून तो पोलिसांसमक्ष शरणागती पत्करणार असल्याची माहिती होती़ मात्र, त्याआधीच माहिती मिळताच मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. मंदिराच्या सुरक्षारक्षकाने त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस पथक त्याचा शोध घेत होते. (छायाचित्र सौजन्य : एएनआय)

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

दोन हजारची नोट बंद

दोन हजार रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंतच व्यवहारात राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत. …

पतंजलीच्या ‘मंजन’मध्ये माशाच्या हाडाचा वापर : रामदेव बाबा अडचणीत?

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला दिल्लीतल्या एका लीगल फर्मने कायदेशीर नोटीस धाडली आहे. पतंजलीचं उत्पादन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *