गोहाटी : मागील तीन ते चार आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामात पुरासंबंधित [aasam flood] दुर्घटनांमध्ये मृतकांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय घरे, शेतपिके, रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती, पाळीव आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.
आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 30 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुराचा सर्वांधिक परिणाम 4.53 लाख लोकांना गोलपाडा जिल्ह्यात झाला आहे. बारपेटामध्ये 3.44 लाख आणि मोरीगावातील 3.41 लाखांहून अधिक लोकांवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील पुरामुळे राज्यात शक्य तितकी मदत देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सबार्नंद सोनोवाल यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत दिले आहे.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …