Breaking News

विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश सज्ज

Advertisements

चंद्रपूर :
शनिवारी गणेशचतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन झाले असून यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० कृत्रिम तलाव तसेच २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्सवाप्रसंगी निबंर्धांचे पालन करावे लागणार आहे. यंदा घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे आणि सार्वजनिक मंडळाने तेथेच जवळपास व्यवस्था करून विसर्जन करावे. इतर सर्व मूर्तींचे विसर्जन पुर्णपणे कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. मागील वर्षी १५ निर्माल्य कलश व २२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यावर्षी २० कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. यात झोन क्र. १ (कार्यालय) – २, दाताळा रोड, इरई नदी – २, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका – १, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर) – २, नटराज टॉकीज (ताडोबा रोड)-२, गांधी चौक-१,शिवाजी चौक-२, रामाळा तलाव- ४, महाकाली प्रा. शाळा-१, नेताजी चौक बाबुपेठ-२ , झोन क्र. ३ (कार्यालय) -१ असे एकूण २० कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. संस्कृती आणि र्शद्धेचे प्रतिक असलेला गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या छायेत आलेला आहे. गणेशाचे आगमन होताना दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये आणि विसर्जन घरीच करावे. हे सर्व करून आपणच विघ्नहर्ता बनावे आणि कोरोनाचे संकट या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दूर करावे. नागरिकांनी आपल्या जवळच्या कृत्रिम तलावात श्रीमुतीर्चे विसर्जन करून कोव्हीड – १९ विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Advertisements

 

कृत्रिम तलाव स्थळ
झोन क्र. १ (कार्यालय) -२, दाताळा रोड, इरई नदी -२, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका-१, तुकुम प्रा. शाळा (मनपा,चंद्रपूर)-२, नटराज टॉकीज (ताडोबा रोड)-२, गांधी चौक-१, शिवाजी चौक-२, रामाळा तलाव-४, महाकाली प्रा. शाळा-१, नेताजी चौक बाबुपेठ-२, झोन क्र. ३ (कार्यालय)-१, असे एकूण – २२
निर्माल्य कलश
झोन क्र. १ (अ) – ६, झोन क्र. १ (ब) -२, झोन क्र.- २ (अ) – ८, झोन क्र. ३ (अ) – १, झोन क्र. ३ (ब) – २, झोन क्र. ३ (क) – १ : एकूण – २०

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूरच्या पर्यावरणनगर उद्यानात साप : सर्वत्र दुर्गंधी, मनपा-नासूप्रची चालढकल

नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, …

नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे पडली : जोरदार पावसाची प्रतीक्षा

नागपूरमध्ये रविवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *