Breaking News

कोरोना चाचणीच्या संख्येत वाढ करा

ब्रम्हपूरी :
नागपूरजवळ असल्यामुळे येणार्‍या नागरिकांची संख्या लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार यांनी तालुकास्तरीय अधिकार्‍यांची ब्रम्हपुरी येथे बैठक घेऊन कोरोना आजारासंदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगराध्यक्ष रिता उराडे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा परिषदेचे उपअभियंता नन्नावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुधपचारे आदींची उपस्थिती होती.
वडेट्टीवार यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना जिल्ह्यात मोठी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, गरजेनुसार व तातडी बघून नागपूर आणि चंद्रपूर येथील प्रयोगशाळेचा वापर करण्याचे सूचित केले. चंद्रपुरात अडीच कोटी रुपयांची स्वॅब तपासणीची कोरोना प्रयोगशाळा उभी झाली असून, या प्रयोगशाळेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. जिल्ह्यामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णाची तपासणी गतीने होत आहे. या प्रयोगशाळेचा वापर करण्याचेदेखील यावेळी त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांना निर्देशित केले.

यावेळी खनिज निधीमधून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या रस्ते बांधकामाचा त्यांनी आढावा घेतला. मंजूर झालेल्या रस्त्यांना तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बांधकाम विभागाला केले. पावसाळ्याच्या पूर्व काळात रस्ते बांधकाम गतीने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा संदर्भातही आढावा घेतला. तालुक्यातील बंद पडलेल्या योजना, तांत्रिक अडचणीमुळे मागे पडलेल्या योजना व ग्रामीण भागात वीज जोडणीमुळे मागे पडलेल्या योजनांची विभागणी करून प्राथमिकतेने काम करण्याचे निर्देश यावेळी दिले.
पावसाळ्यामध्ये साथ रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक औषध पुरवठा व सर्व कर्मचार्‍यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश द्यावे, असे स्पष्ट केले. यावेळी महसूल यंत्रणेनेदेखील आगामी काळात आवश्यक सर्व कर्मचारी मुख्यालयी राहतील, याकडे लक्ष वेधण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये आतापर्यंत 12 बाधितांची नोंद आहे. मात्र, सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून, येणार्‍या नव्या नागरिकांची गावपातळीवर योग्य नोंद घेतली जावी, असे निर्देश दिले. डॉ. खिल्लारे यांनी, ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल दिला. 70 ते 80 टक्के ग्रामीण रुग्ण याठिकाणी येत असून, तातडीने स्वॅब तपासणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://www.tarunbharat.net//Encyc/2020/8/24/Increase-the-number-of-corona-tests.html

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *