वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी :- कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले होते सुमारे पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामे पूर्णपणे बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बांधकाम कामगारांची या गंभीर प्रश्नाची दाखल घेत स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 23/3/2020 रोजी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना कोरोना अर्थसाहाय्य पाच हजार रुपये देण्यात यावे अशा प्रकारची मागणी करणायत आलेली होती त्या अनुशंघाने मागील दोन महिन्या अगोदर राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दोन हजार अर्थसहाय्य डी.बी.टी.पद्धतीने कामगारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते व त्यानंतर नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामागर कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार देण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील दहा लाख कामगारांना मिळणार असून सदर.आर.टी.जी.एस ची प्रक्रिया सुरु झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात राज्यातील कामगारांच्या खात्यात तीन हजार अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे वर्धा जिल्ह्यातील जवळपस सत्तर हजार नोंदीत कामगारांना तीन हजार अर्थसाहाय्य लवकरच जमा होईल राज्यातील एकही कामगार अर्थसाहयापासून वंचित राहू नये या करिता महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य सचिव श्री.चू.श्रीरंगम हे स्वतः जतीने लक्ष घालत असून त्यांच्या निगरानिमध्ये राज्यातील दहा लाख कामगारांना लवकरात लवकर अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया युद्ध स्तरावर मंडळाच्या वतीने सुरु झाली आहे. अशी माहिती स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी दिली.

वर्धा जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजाराचे मिळणार अर्थसाहाय्य
Advertisements
Advertisements
Advertisements