ब्रम्हपुरी(दि.४सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या. व त्यांच्या समस्या लवकरात लवकर पारित व्हाव्या या करता रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने, (एस. डी. ओ.) उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाच्या काही मागण्या मान्य कराव्या असे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी यांच्या वतीने करण्यात आल्या, ज्या पूरग्रस्तांच्या घरांची तथा शेतीची नुकसान झाली असेल त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.
तसेच जे गाव नदी पात्रात आहेत, त्यांचं पुनवर्सन करून त्यांना पक्के नवीन घरे देण्यात यावी, ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी, ज्या पूरग्रस्तां कडे गुरे, गाय, म्हैस, शेळी, बैल ई. जनावरे असतील त्यांना एक महिनाच प्रशासना कडून खाद्य देण्यात यावे, तसेच नदी लगतच्या शेती मध्ये पुरामुळे रेती आल्या असल्या मुळे , रेतीची योग्य ते विल्हेवाट लावण्यात यावी. व प्रत्येक पूरग्रस्त शेतकऱ्याला बीज बियाणे मोफत देण्यात यावी. व पूरग्रस्तांना ताबडतोब ५०,००० रुपयांची मदत त्वरित करून , रोजगानिर्मिती करून देण्यात यावी. अश्या प्रकारे निवेदन देतांना गोपालजी मेंढे विधानसभा अध्यक्ष प्रभुजी लोखंडे तालुका अध्यक्ष राजेंद्र मेश्राम तालुका महासचिव सुखदेव राऊत तालुका प्रभारी आनंदराव मेश्राम तालुका उपाध्यक्ष मार्कंड बावणे किशोर प्रधान रोशन मेंढे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.