वर्धा :- शनिवारी दि 5 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 1324 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 140 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 85 पुरुष आणि 55 महिलांंचा समावेश आहेत.
वर्धा तहसीलमध्ये 66 रुग्ण आढळले असून यामध्ये 38 पुरुष तर 28 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 9 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 1 महिलेचा सामावेश आहे.तसेच आर्वीमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे.तसेच आष्टीमध्ये 4 पुरुष रुग्ण आढळले आहे. कारंजामध्ये 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 1 पुरुष 3 महिलांंचा समावेश आहे. तसेच हिंगणघाटमध्ये 37 रुग्ण आढळले असून यामध्ये 28 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.तर समुद्रपूरमध्ये 2 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
सध्या स्थितीत 685 ऍक्टिव्ह रुग्णांंवर उपचार सुरू आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण 850 व्यक्ती आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 1602 वर पोहचली आहे.शनिवारी 60 व्यक्तिंनी कोरोनावर मात केली आहे.एकूण 886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
आज मृत्यू 0 (शून्य) असून एकूण मृत्यू संख्या 31 इतकी आहे.यामध्ये कोरोनामुळे 30 मृत्यू तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.एकूण गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती संख्या 76158 असून आज गृहवीलगिकरणात 3238 व्यक्ती आहे.
जिल्ह्यात रोज आढळत असलेले कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.