वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांनी आर्वी तालुक्यातील आदर्श गावकरिता दत्तक घेतलेल्या पाच गावांपैकी बोथली या गावांतील माहिती केंद्रामध्ये गूगल मीटिंग द्वारे शिक्षक दिन साजरा केला .यामध्ये प्रकल्पामार्फत दरोरोज पाचही गावामध्ये उपचारात्मक वर्ग चालविला जातो .यामध्ये प्रथम 1 ते 2 यादरम्यान गूगल मीटिंग घेण्यात आली .यामध्ये सर्व शिक्षकांनी आपले अनुभव ऑनलाइन पद्धतीने मांडले . मीटिंग नन्तर शिक्षक लोकांना प्रकल्प व्यवस्थापक श्री पराग काळे व श्री.रवींद्र तांदुळकर यांच्या हस्ते प्रमानपत्र वाटप करण्यात आले. या मीटिंग मध्ये SBI फौंडेशन चे मुख्य अधिकारी श्री.के.मंजुळा तसेच श्री.राजाराम चव्हाण, श्री.सिंदलिंगेश,प्रतिभाजी इत्यादी लोक ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते .

SBI ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने ऑनलाइन शिक्षक दिन साजरा
Advertisements
Advertisements
Advertisements