चंद्रपूर : वरोरा व भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळी, उंच अळी, करपा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे शेंगा पोखरणाऱ्या अळीने शेंगा खाऊन टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे.
सध्या पाऊस व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अळीला पोषक वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे अळीचे प्रमाण वाढले आहे. आमदार प्रतिभाताई धानोरकर शासनाच्या वतीनं योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
विशेष म्हणजे कृषी विभाग आता कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव व त्यावर उपाययोजना कशा कराव्यात. याची माहिती देण्यासाठी ‘माहिती रथ’ गावागावातून फिरवला जावा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहे. त्यासोबतच या भागात अन्य ठिकाणी देखील याचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिल्या आहे.
भद्रावती तालुक्यातील शिवारातील सोयाबीन पिकांला उंट, लष्करी अळीसह अन्य किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यात शेती हंगामाच्या सुरवातीला बोगस सोयाबीन बियांमुळे शेतकरी बांधव कमालीचे त्रस्त झाले होते. यावेळी शेतकरी बांधवाना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला शेतीचे सहित्य मिळायला त्रास सहन करावा लागत होता. ता मात्र अळी मुळे पीक हातातून गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर पुढे येत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे या शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई करण्याची मागणी केली आहे.