बहुजन विध्यार्थी संघटनेची मागणी
सिंदेवाही –
कोरोना वैश्विक महामारीत सिंदेवाहीतील ना नफा -ना तोटा तत्वावर सुरू असलेल्या विध्यार्थी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पूर्णपणे बंद आहेत .दरम्यान ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आक्टोबर -2020 मध्ये घेणे अपेक्षित आहे .
त्यामुळे ,या परीक्षेला बसलेले परीक्षार्थी विशेषता ग्रामीण भागातील विध्यार्थी कोरोना लाकडाऊनमूळे बंद अभ्यासिका अभावी कसे -बसे परीक्षेची तयारी करीत आहेत .परिणामता, अभ्यास करण्यास योग्य वातावरण त्यांना मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत असल्याची व्यथा तालुक्यातील अभ्यसिकेचा यापूर्वी लाभ घेत असलेल्या परीक्षार्थी विध्यार्थीनी प्रातिनिधिक रुपात बहुजन विध्यार्थी संघटना सिंदेवाहीच्या माध्यमातून बोलून दाखविली आहे .
सदर विध्यार्थी संघटनेने विध्यार्थीच्या या ज्वलंत व गंभीर प्रश्नाची दखल घेउन सिंदेवाही तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा आक्टोबर -2020 ला बसलेल्या एकंदरीत पन्नास परीक्षार्थी विध्यार्थीसाठी सिंदेवाहीतील दानशूर व्यक्तीमार्फत चालविले जाणाऱ्या व कोरोना काळात बंद करन्यात आलेल्या सिंदेवाही शहरातील राष्ट्रपिता ज्योतिबा फूले विध्यार्थी अभ्यासिका सुरु करण्याची परवानगी विध्यार्थी हित लक्षात तात्काळ सुरु करण्यासाठी सिंदेवाही तालुका तहसील प्रशासनाने परवानगी प्रदान करावी ,असी मागणी बहुजन विध्यार्थी संघटनाचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे .