आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे
————————————-
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
*कोरोणासह डेंग्यू रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले*
कोरोणा डेंग्यू सारखे आजारात वाढ होण्यासाठी नागरीकच जबाबदार आहेत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून डेंग्यू आजार पसरविणारा एडिस डास कशा व कुठे तयार होतो याची माहिती देतात परंतु दिलेल्या सुचनाचे पालन करीत नसल्यामुळे डेंग्यूचा आजार पसरतो *कोरोणा बाबत नागरीकांना दिलेल्या सुचनाचे पालन होत नसल्यामुळे रुग्णात वाढ होत आहे असे प्रतिपादन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले* .
आरोग्य कर्मचारी कोरोणा व डेग्यू रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे (मानकर) यांच्या मार्गदर्शनात शर्यतीचे प्रयत्न सुरु आहेत
गौळ येथे ४९ घरोघरी जावून जिल्हा हिवताप कार्यालयातील किटकशास्त्रीय सर्वेक्षण अंतर्गत पौढ डास संकलन किटक समाहरक रवी चंदरे यांनी करुन नागरीकांना हिवताप डेंग्यू ( एनाफँलीस व एडिस ) पसरविणारे डासाची ओळख करुन दिली
*गौळ येथे कटेंनर टेमिफाँस सर्वेक्षणात आरोग्य सहाय्यक दिपक मेशराम सविता फरताडे आरोग्य सेवक दिलीप उटाणे माधव कातकडे शैलेश चौधरी गणेश चंदेल डॉ सुमेध वासेकर उषा मांदाडे हुसना बानो शिला मडावी कविता झाडे आशा वर्कर निर्मला नामदार .आरोग्य कर्मचारी अशी टिम करुन सर्वेक्षण केला सरपंच मिलींद खोडके उपसरपंच मनोज नागपूरे पञकार योगेश कांबळे पोलीस पाटील अरंविद कांबळे यांनी सहकार्य केले
*कोरोणा प्रादुर्भाव व डेग्यू हिवताप सारखे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे*
कोरोणाचा धोका संपला नसून सतर्क राहण्याची गरज आहे कोरोणा सोबतच डेंग्यू हिवताप .किटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याची गरज आहे
*डेग्यू प्रतिरोध* – एक दिवस एक कार्यक्रम गावा गावात राबविले जात आहे गृभेटीत माहिती पञके वाटप केले जात आहे जनतेशी संवाद साधण्यात येत आहे.आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून पावसाळ्यात होणाऱ्या आजारा बाबत माहीती देवून जनजागरण करीत आहेत
कारण घरातील वापरायच्या पाण्याच्या भांडीत डास निर्माण होतात .त्यामुळे हिवताप डेग्यू आजारावर मात करण्यासाठी एक दिवस कोरडा पाडून नागरीकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे.
*डेंग्यू आजार नियंत्रणासाठी कंटेनर सर्व्हेक्षण प्रत्येक गावात ग्राम पंचायत यांच्या सहकार्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी मार्फत एन्फ्यालिस व एडीस डास असलेली दुषीत भांडी शोध घेवून कुटूंबाना दुषीत भांडी असल्याचे परिणाम सांगण्यात येत आहे