Breaking News

नागपूर : लकडगंज पोलिसांची कामगिरी – चोरीच्या गुन्ह्याचा 3 दिवसात छडा लावत 5 आरोपींना केले जेरबंद – मुद्देमालासह ओमनी मारुती कार केली जप्त

अँडराईट फार्माक्युटीकल्स कंपनीमधून 1,10,000  रुपयांचा कच्चा माल चोरुन नेण्याऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने केले जेरबंद

नागपूर : प्रतिनिधी :- प्राप्त माहितीनुसार गरोबा मैदान येथील अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनी मध्ये अंदाजे 1500 किलो प्लॅस्टिक बॉटल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत अंदाजे 1,10,000 रु. मटेरियल चोरी गेल्याची तक्रार दि.9/9/20 रोजी फिर्यादी अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे मॅनेजर यांनी लकडगंज पोलीस स्टेशन येथे दिली.सदर तक्रारीमध्ये कंपनीमध्येच काम करणाऱ्या 4 इसमांनी मुद्देमाल 20 ते 25 बोरीमध्ये भरूण पांढऱ्या रंगाच्या ओमनीमध्ये घेवुन जातांना फिर्यादिला आपल्या कंपनीमध्ये लावलेल्या सी.सी.टि.व्हि.फुटेज मध्ये दिसून आल्याचे त्यांनी आपल्या लेखी तक्रारमध्ये नोंद केली.सदर तक्रारदाराच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध कलम 381,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपास हाती घेताच यातील आरोपी क्र. 01 )पवन लाला शर्मा वय 19 वर्षे रा . प्लॉट नं . 185 , लोहा मार्केट , घास बाजार , जुनी मंगळवारी पो.स्टे.लकडगंज नागपूर शहर,व 02 ) नयन धनराज चिमुरकर वय 19 वर्षे रा . फुले यांच्या घरी किरायाणे दर्शन कॉलोनी , गजानन मंदिर , एन.आय.टि. गार्डन जवळ , नंदनवन , नागपूर शहर यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली व त्यांच्या पिसीआर घेण्यात आला.पीसीआर दरम्यान अटक आरोपीतांनी सदर गुन्हयातील आरोपी क्रंमाक 03 ) सुरेन्द्र लकेश्वर गजभिये वय 32 वर्षे , रा . कायमचा पत्ता खौरी तायगाव , तहसिल सौंसर , जिल्हा छिदवाडा , पो.स्टे . लोदिखेडा , मध्य प्रदेश, व 04 ) प्रविण चंद्रमनी कापसे वय 28 वर्षे , रा . टेकडी वाडी , हॉमोओप्याथी दवाखान्या जवळ , खडगाव रोड पो.स्टे . वाडी नागपूर शहर यांच्या सांगण्यावरून प्लॉस्टिकच्या बोरी मध्ये माल भरूण ठेवला असे सांगीतले यावरून आरोपी याचे मोबाईलचे लोकेशन वरून त्यांना ताब्यात घेउन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.अटक दरम्यान आरोपी क्रंमाक 04 ) यांने देलेल्या कबुली प्रमाणे सदर गुन्हा आरोपी क्रंमाक 03 व 04 यांनी सोबत मिळुन केल्याची कबुली दिली तसेच सदरचा माल हा त्यांच्या परीचीत आरोपी क्रंमाक 05 ) सुदेश उर्फ बबलु गुरूजी जयदेवप्रसाद शाहु वय 42 वर्षे , प्लॉट नं . 800 , मिनीमाता नगर भंडारा रोड , आनंद चौबे शाळेच्या मागे पो.स्टे.कळमना नागपूर याला विकला असुन सदर चा माल हा त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मारूती ओमनी ( व्हॉन ) क्रंमाक एम.एच .31 , ए .जी . 5018 मध्ये नेला असल्याचे सांगीतले यावरून मेमोरेंंडम पंचनाम्या प्रमाणे बबलु कबाडी याच्या कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल हा जप्त करण्यात आला व सदर गुन्हा करण्यासाठी वापरेलेली चारचाकी मारूती ओमनी ( व्हॉन ) गाडी ही मेमोरेंडम पंचनाम्या प्रमाणे जप्त करण्यात आली.व सदर गुन्हयात भादंवि 411 प्रमाणे कलम वाढ करून आरोपी क्रंमाक 05 ) यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर कंपनी हि संजय कुकरेजा रा.जरीपटका यांची मालकीची असुन वर नमुद आरोपी 1,2,3,4 हे चारही आरोपी हे सदर कंपनीमध्ये दवाई बनविण्याचे काम करत होते व ते चारही आरोपी मागील चार वर्षापासुन सदर कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.या चारही आरोपींनी आपसात संगनमत करून सदर कंपनीमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. सदरची कार्यवाही मा.राहुल माकनीकर साहेब पोलीस उप आयुक्त परिमंडल क्र. -3 तसेच मा.परदेशी साहेब सहायक पोलीस आयुक्त लकडगंज विभाग,श्री. नरेंद्र हिवरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांंच्या मार्गदर्शनात पोउपनि सुनिल राऊत,भावेश कावरे पो.हवा. श्याम अगथुलेवार,ना.पो.शि. संदिप पाटिल,पवन भटकर, अभीषेक शनिवारे पो.शि. सांरग राउत यांनी केली आहे.

About Vishwbharat

Check Also

पालकमंत्री बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार

विकासाचा प्रश्न, रस्ते, पाणी आणि आरोग्यविषयक प्रश्न कायम असताना जिल्ह्याचे भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित …

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर शाहीर कलाकार यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *