वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.13 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 707 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 52 अहवाल प्रलंबित आहे.आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 46 महिलांचा समावेश आहे.तर आज 52 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आज पर्यंत एकूण 2570 रुग्ण आढळून आले आहे.त्यापैकी जिल्ह्यात 1280 रुग्ण ऍक्टिव्ह असून यांच्यावर उपचार सुरू आहे.आज आढळून आलेल्या रुग्णातमध्ये वर्धा तहसीलचे 64 रुग्ण आढळले असून यामध्ये 41 पुरुष तर 23 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 1 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 27 रुग्ण आढळले असून यामध्ये 19 पुरुष तर 8 महिलेचा सामावेश आहे.तसेच आर्वीमध्ये 2 रुग्ण आढळले असून यामध्ये 1 पुरुष तर 1 महिलांचा समावेश आहे.तसेच आष्टीमध्ये 1 पुरुष आढळून आला आहे.तसेच हिंगणघाटमध्ये 32 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 12 महिलांचा समावेश आहे.तर समुद्रपूरमध्ये 1 महिला रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने -26758 इतके आहे. त्यामधून 23899 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.यामध्ये 52 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात एकूण 1253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज जिल्ह्यात 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये हिंगणघाट येथील 1 पुरुष, सेलू येथील 1 पुरुष तर जिल्ह्यात एकूण 47 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.तर कारंजा येथील 1 महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात दररोज 100 च्या वर रुग्ण आढळून येत आहे .तसेच आढळत असलेले कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Check Also
भर दिवसा रस्त्यावर आला वाघ
भर दिवसा रस्त्यावर आला वाघ गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील साकरीटाेला-रामपूर-अंजोरा मार्गावर शुक्रवार २० जून रोजी …
देश में कोरोना वायरस के 6 हजार से ज्यादा एक्टिव केस
देश में कोरोना वायरस के 6 हजार से ज्यादा एक्टिव केस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …