Breaking News

कोविड-19 प्रार्दुभावाच्या काळात केन्द्रसरकारने शेतीकरिता व जोडधंदयाकरिता भरिव तरतुद

Advertisements

खासदार रामदास तडस यांच्या प्रश्नाला केन्द्रीय कृषी मंत्री श्री.नरेन्द्र सिंग तोमर जी यांचे उत्तर

Advertisements

दिल्ली/वर्धा: लोकसभेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यानंतर वर्धा लोकसभा कोविड-19 च्या प्रादुर्भावा अंतर्गत केन्द्रशासनाने शेतक-यांना कोणती विशेष मदत उपलब्ध करुन दिली याबाबत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतरांकित प्रश्न संख्या 233 अंतर्गत प्रश्न उपस्थित केला.

       या प्रश्नाला उत्तर देतांना केन्द्रीय कृषी मंत्री श्री. नरेन्द्र सिंग तोमर जी यांनी स्पष्ट केले की, कृषि अवसंरनचा कोष अंतर्गत केन्द्रीय क्षेत वित्त पोषण सुविधा ची योजना दिनाकं 08/07/2020 ला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये व्याज सुट आणि आर्थीक मदत देण्यात येत आहे. शेतकरी पिक कर्जाच्या अंतर्गत शेतक-यांना कर्ज यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी 8460 करोड रुपये अस्थायी स्वरुपात देण्यात आलेले आहेे. शेतक-यांना सवलतीच्या प्रोत्साहन कर्ज योजने अंतर्गत 3 संप्टेबंर 2020 पंर्यत 123.51 केसीसी कार्ड आणि 106,191 करोड रुपये मंजुर करण्यात आले आहे. शेतक-यांसाठी आपत्कालीन कार्यकारी भांडवल 30000 करोड रुपयाची अतिरीक्त मंजूर करण्यात आली आहे, हा निधी नाबार्डच्या माध्यमातुन सहकारी बॅक आणि क्षेत्रीण ग्रामीण बॅंक व्दारा शेतीकर्जाकरिता छोटे व मध्यम शेतक-यांला लाभ होईल, मासेमारी करिता सहाय्यता करिता प्रधानमंत्री मत्स्य सम्पदा योजना अंतर्गत मत्सपालन के लिये 11000 करोड व मुलभूत रचना (मत्स्य पकडण्याकरिता बंदरगाह, शीट श्रृखंला, बाजार)च्या विकासाकरिता 9000 करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच पशुपालक व दुग्ध विकास करणा-या घटकाकरिता डेयरी प्रस्करण, मूल्य संवर्धन आणि पशुचारा पायाभूत सुविधा वाढविण्याकरिता पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास स्थापन करुन याकरिता 15000 करोड रुपये निधी मंजुर करण्यात आलेला आहे, केन्द्रसरकारने कोरोना परिस्थीती लक्षात घेऊन शेतक-यांना अभुतपूर्व अशी मदत केली असल्याचे उत्तर केन्द्रीय कृषी मंत्री श्री. नरेन्द्र सिंग तोमर जी यांनी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले.

Advertisements

       शेतक-यांच्या हितार्थ कुठल्याही परिस्थीतीत अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे तसेच केन्द्रशासनाच्या माध्यमातुन सर्वोतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकसभेच्या माध्यमातुन जास्तीत सामान्य नागरिकांचे व शेतक-यांचे लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *