Breaking News

“कोरोना आजाराच्या बाजारा” विरोधात “आप” चे जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण संपन्न !

  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “खाजगी जंबो कोविड सेंटर” च्या विरोधात अॅड. गोस्वामी यांच्या नेतृत्वात एल्गार !
  • “आप” चा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सवाल!
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आज एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कोबी रुग्णांची वाढती संख्या व त्यासोबतचं मृतकांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था नाही, डॉक्टरांच्या अभाव आहे, मृतकाचे नातेवाईक आरोग्य व्यवस्थेवर आरोप करीत आहे. अशा स्थितीमध्ये ही चंद्रपूर जिल्ह्यात जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे व ते ही खाजगी ! “आजाराचा बाजार” केला जात असल्याचे आज शहरात बोलल्या जात आहे. श्रीमंत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर हे गरीब रुग्णांवर ही उपचार केला जातो. परंतु जिल्ह्यात उभे राहणारे खाजगी “जम्बो कोविड सेंटर” फक्त श्रीमंत लोकांसाठीच उभारण्यात येत असल्याचे दिसत आहे या विरोधात आप पक्षाने आज आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणानंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना “आप”च्या माध्यमातून निवेदन सादर करून सुचेना देण्यात आलेल्या असून काही रास्त मागण्याही करण्यात आल्या आले. या निवेदनात चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना च्या संक्रमण वाढत असून प्रशासन मान्य करीत आहे की, लवकरच हा आकडा 20,000 पार करणार आहे. रोज लोक मृत्युमुखी पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा कमी पडत असून रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे, असे असतांना सरकार मात्र उपाय योजना करताना दिसत नाही. ही चिंतेची बाब आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्री यांनी आरोग्य यंत्रणा विषयी आढावा बैठक घेत त्यात जिल्हाधिकारी यांना 700 बेड च्या जम्बो कोवीड़ सेंटर उभारण्याची निर्देश दिल्याची बातमी होती. दीड महिना लोटूनही सरकारी जम्बो हॉस्पिटल का सुरू करण्यात आले नाही. तसेच महिलांसाठी 100 बेड चे हॉस्पिटल ही सुरू झालेले नाही. तालुक्याच्या ठिकाणी 1C यूनिट आणि ऑक्सीजन सपोर्टेड बेड सुरू होणार होती त्याचे काय झाले. एकंदरीत सरकारी यंत्रणा संपूर्ण पणे ढेपाळलेली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मध्ये ICU पाहिजे युनिट ऑक्सिजन सपोर्टेड बेड उपलब्ध करून देण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आले होते. एका बाजूला सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत असताना दुसऱ्या बाजूला खालची यंत्रणा स्थानिक प्रशासन खाजगी कोविड सेंटर तयार करून गरीब व श्रीमंत रुग्ण असा भेदभाव करीत आहे शकुंतला लॉन्स वर 700 खाटांची जम्बो कोविड सेंटर हे खाजगी कंपन्यांच्या मार्फत उभी राहत आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानुसार एका डॉक्टरांचे नावांने दस्ताऐवज तयार करून, खाजगी जंबो कोविड सेंटर उभे केले जात आहे. या खाजगी जम्बो कोविड सेंटर त्याच्यामध्ये राजकीय नेते व अधिकारी असल्याचे वर्तमानपत्रात छापून आले आहे. सरकारकडून जम्बो कोविड सेंटर सुरू होईल आणि यातून गरिबांना मोफत उपचार मिळेल. ही अपेक्षा असताना खासगी कंपन्यांन मार्फत सेंटर उभारण्यात येते आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सर्वतर व सरकार/महानगरपालिकेच्या जम्बों कोविड सेंटर तयार केले. त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. चंद्रपूरच्या नशीबी मात्र हे खाजगी कंपनीचे रुग्णालय आलेले आहेत. रुग्णांच्या आजारातून नफा कमविण्यासाठी करीता जर असे खाजगी कंपन्यान समोर येऊ लागल्या तर गरिबांचे हाल होणार आहे.
आमची मागणी अशी आहे की, 1. पुणेच्या धर्तीवर, पालकमंत्री जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या प्रमाणे ७०० बेडचे जम्बो शासकीय कोविड सेंटर सूरु करावे., 2. शकुंतला लॉनवर खाजगी कंपनी /पार्टनरशिप द्वारे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे किंवा कसे याबाबत कृपया खुलासा करावा., 3. शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टर नाव पुढे करून परदयामागील राजकीय नेते व अधिकारी यांची पार्टनरशिप कंपनी आहे, अशी बातमी सतत समोर येत आहे याबाबत खुलासा करणे आवश्यक असून जनतेसमोर सत्य काय ते आले पाहिजे., 4. जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत सर्व नियम बाजूला ठेवून मनपाने परवानगी जिल्ह्याची बातमी आहे. या कोविड सेंटर चे मलमूत्र सांडपाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे अशी बातमी आहे. याबाबत सुद्धा आपण अधिकृत माहिती देऊन जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *