Breaking News

जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त

Advertisements

जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत ग्रामीण भागातातील प्रत्येक घरी सुरक्षीत पाणी पोहचविण्याकरिता महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त

Advertisements

-खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय जल शक्ती राज्यमंत्री श्री. रतनलाल कटारीया यांचे उत्तर

Advertisements

* खासदार रामदास तडस यांनी  लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1985

* महाराष्ट्र राज्याला सन 2019-20 मध्ये रु. 847.97 करोड आणि सन 2020-21 मध्ये रु. 1828.92 करोड  एकुन रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त

वर्धा/दिल्लीः ग्रामीण भागातील प्रत्येक घराच्या परिसरात नळजोडणी असणे व पाण्याची पूर्तता होणे आवश्यक आहे, परंतु आजही देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ पाणी मिळू शकत नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, ग्रामीण भागातील प्रत्येक घरी स्वच्छ पाणी मिळावी यासाठी केन्द्रसरकारने कोणती योजना तयार करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे, या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी दिनांक 20/09/2020 ला अतारांकित प्रश्न संख्या 1985 अंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले.

        खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर  केन्द्रीय जल शक्ती राज्यमंत्री श्री. रतनलाल कटारीया यांचे लेखी उत्तर प्राप्त झाले असून त्यानुसार केन्द्रसरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी पाणीपुरवठा करण्यासाठी रु. 3.60 लाख करोड निधी मंजूर करण्यात आला असुन केंद्र सरकारने राज्य सरकारच्या भागीदारीतुन जल जीवन-हर घर जल अभियान सुरू केले आहे. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी पाणीपुरवठा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियांतर्गत देशातील जल गुणवत्ता प्रभावित क्षेत्राची ओळख राज्य/संघ राज्य क्षेत्र व्दार करण्यात येत आहे, पाणी पुरवठा हा विषय राज्याचा असल्यामुळे केन्द्र सरकार ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याकरिता राज्यांना आर्थीक मदत दिली जातात, यासाठी महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतला आहे, देशातील 27544 प्रभावीत गावांना सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी मार्च 2017 ला राष्ट्रीय जल गुणवत्ता उप-मिशन ची सुरुवात केलेली होती, आता जल जीवन मिशन मे समावेश करण्यात आलेला आहे यासाठी आजपंर्यत महाराष्ट्र राज्याला रु. 18.79 करोड रुपए देण्यात आलेले आहे. महाराष्ट्राला जल जीवन मिशन- हर घर जल अंतर्गत ग्रामीण भागातील परिवारांना प्रत्येक घरी नळ जल कनेक्शन सुरक्षीत जल पोहचविण्याकरिता सन 2019-20 मध्ये रु. 847.97 करोड आणि सन 2020-21 मध्ये रु. 1828.92 करोड एकुन रु. 2676.89 करोड रुपये केन्द्रसरकार कडून देण्यात आले आहे, या शिवाय राज्य सरकार वार्षिक कार्य योजना तथा नल जल कनेक्शनची कार्यकुशलता च्या अनुशंगाने वास्तविक व वित्तीय प्रगतिकरिता अध्यधीन निष्पादन अनुदानाच्या रुपात अतिरीक्त निधीची मांगणी केन्द्र सरकारला करु शकतात. जल जीवन मिशन अंतर्गत गुणवत्ता प्रभावीत गावांना सुरक्षित पेयजल ची व्यवस्था करण्याची प्राथमिकता देण्यात आली आहे तसेच राज्य जल गुणवत्ता निगरानी आणि पर्यवेक्षण गुतिविधीया साठी केन्द्रीय निधीमधील 2 टक्के उपयोग करु शकत असल्याचेही उत्तरातुन स्पष्ट केले.

        केन्द्रसरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन- हर घर नल, हर घर जल  योजना सुरु केलेली आहे,  मिशन- हर घर नल, हर घर जल या योजनेतून 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचवण्याकरिता केन्द्रसरकारने महाराष्ट्र राज्याला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घराच्या परिसरात नळजोडणी व स्वच्छ जल उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, जल जीवन मिशन- हर घर नल, हर घर जल या योजनेतून ग्रामीण भागातील परिवारांना निश्चतीच स्वच्छ जल उपलब्ध होण्यास मदत होईल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *