Breaking News

खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन

Advertisements

वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
सहा महिने शेतकर्‍यांनी मातिमोल भ‍वाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले तर सराकरने अचानक कांदा निर्यात बंद करुन शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरकारने नुकतेच शेती व्यापाराला स्वातंत्र्य देणारे विधेयक मंजुर केले आहे. शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो व युद्धा सारख्या आणिबाणिच्या परिस्थितीतच सरकार दर नियंत्रणसाठी हस्तक्षेप करेल असा कायदा केला आसताना सरकारने कांदा निर्यात बंद करून स्वताच कायदा मोडला आहे. ग्रहकांना खुश करून बिहारची निवडणुक जिंकण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते मधुसुदन हरणे यांनी आंदोलन प्रसंगी केले. कांद्याची निर्यातबंदी करून कांदा उत्पदाकांच्या प्रपंचाची शासनाने राखरांगोळी केली आहे म्हणुन खासदारांच्या दारात निर्यातबंदी आदेश जाळुन त्याची राख करायची व त्यांच्या दारात कांद्याची रांगोळी काढण्याचे राज्यव्यापी आंदोलन शेतकरी संघटनेने केले.
कांदा निर्यात बंद करून सरकारने शेतकर्‍यांचे नुकसान तर केले आहेच पण देशाची ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, निर्यातीतून मिळणारे परकीय चलन सुद्धा सरकारने बुडवले आहे. सरकारची ही कृती देशद्रोही आहे असा आरोप आंदोलकांनी केला.
खासदार हे जनतेचे लोकप्रतिनिधी असून जनतेचे ग्रार्‍हाणे लोकसभेत मांडून न्याय मिळवून देणे खासदारांचे कर्तव्य आहे. खासदारांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन देण्यासाठी शेतकरी संघटनेने हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. वर्धा जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर, महाराष्ट्र युवा आघाडीचेअध्यक्ष सतीश दाणी, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मधुसूदन हरणे, जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर, युवाध्यक्ष अरविंद राऊत, कार्याध्यक्ष प्रमोद तलमले, गणेश मुटे, सचिन डाफे, सारंग दरणे, धोंडबाजी गावंडे, खुशाल हिवरकर, हेमराज इखार, शांताराम भालेराव,पांडुरंग भालशंकर,विशाल फाळके,अरविंद बोरकर,अनिल पोकळे, मुकेश ठाकुर, महादेव गोहो,प्रभाकर रवंदळे, संजय लाडिस्कर,रोशन कुसळे, हेमंत वकारे, प्रकाश जिकार,संदीप कलोडे,माधुरी पाझारे,सतीश मातुरे,जीवन गुरनुले,जगदीश कीनेकर,अभिजीत लाखे,चंद्रमनी भगत,संदीप ठाकरे,संजय टाले, साहेबराव येडे,पदमाकर झालवडे,प्रभाकर झाडे,
आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक उठायें लाभ

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक …

PM किसान योजना में अभी तक बैंक में नहीं आए 2 हजार रूपए? तो करे यह काम- तुरंत आ जाएंगे पैसे

PM किसान योजना में अभी तक बैंक में नहीं आए 2 हजार रूपए? तो करे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *