Breaking News

महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस

वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होत आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणार-या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आजनसरा येथे ग्रामपंचायत भवन व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत आजनसरा पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी केले.

आजनसरा ता. हिंगणघाट जि. वर्धा येथे ग्रामपंचायत भवन  व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत आजनसरा पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस व विधान परिषद आमदार रामदास आबंटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाा.. यावेळी जि.प. अध्यक्ष सरीता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, पं.स. सभापती सौ शारदाताई आंबटकर, पं. स. सदस्य डाॅ. विजय पर्बत, सरपंच श्री श्रावण कचोळे, उपसरपंच श्री नरेंद्र पाटील उपस्थित होते.

खासदार तडस पुढे म्हणाले केन्द्रसरकारने दोन्ही संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी ख-या अर्थाने स्वतंत्र व सशक्त होणार आहे. हा कायदा आजच्या काळाची गरज आहे. एक नवीन क्रांती या शेती क्षेत्रात येणार आहे. शेतकर-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कायदा एक महत्त्वाचं पाऊल आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे सरकार देशातील शेतक-यांच्या हितासाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचे यावेळी म्हणाले.

       केंद्र व राज्य सरकारने विविध योजना लोकौपयोगी तयार केलेल्या आहे. शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभार्थी हा महत्वाचा घटक आहे. त्या योजनांच्या फलनिष्पतीसाठी लाभाथ्र्यांचा सक्रिय सहभागही आवश्यक असल्याने ग्रामसभेच्या माध्यमातून नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक लाभाथ्र्यापर्यंत पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायत पुढाकार घ्याचे असे आवहान यावेळी आमदार रामदासजी आंबटकर यांनी केले.

        यावेळी जि.प. अध्यक्ष सरीता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, पं.स. सभापती सौ शारदाताई आंबटकर यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले

         कार्यक्रमाचे प्रास्तावीक प.स.सदस्य डाॅ. विजय पर्बत यांनी केले, संचालन सरपंच श्री श्रावण कचोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच श्री नरेंद्र पाटील यांनी मानले कार्यक्रमाला सदस्य श्री संजय थुल, श्री राम मेश्राम, सदस्या सौ सीमा बावणे, सदस्या सौ नंदा गाढवे, सदस्या सौ नीता कोसुरकर, सदस्या सौ मुडे, सदस्या सौ उषा बालपांडे, देवस्थान मंडळ उपाध्यक्ष श्री  धनराज मेश्राम , सदस्य श्री नामदेव गाढवे ,सदस्य श्री रमेश ठाकरे, श्री तुषार आंबटकर, सोनेगाव राऊत येथील जेष्ठ नागरिक अध्यक्ष हिंगणघाट प्रभाकर सुपारे,  माजी उपसरपंच श्री प्रमोद बुरीले,  श्री संतोषराव  लोणकर, कात्री येथील  शक्ती केंद्र प्रमुख आनंद उत्तरावर, कान्होली बूथ प्रमुख अविनाश पाटील इंगोले,  टाकळी बूथ प्रमुख  विनोद जाऊंजाळ, बंडूजी  शंभरकर,  हिवरा येथिल माजी सरपंच देविदास इखार,आजनसरा येथील  माजी सरपंच कैलास सिंग बैस, माजी सदस्य  भोजराज बावणे , बबनराव सटोने, नथुजी हुलके,मनोहर चांभारे, महेश कोसुरकर, नरेश अष्टनकार, मारोती वैरागडे, स्नेहल चिडे, प्रभाकर पारवट्कर, विनोद अष्टनकार, सुभाष रेवतकर, संतोष ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

About Vishwbharat

Check Also

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *